' या' आलिशान हॉटेल मध्ये वाढलं जातंय ‘विष’! कुठे सांबारमध्ये ‘विष्ठा’! तर कुठे मटनच्या नावाखाली ‘बीफ’चा खेळ;




' या' आलिशान हॉटेल मध्ये वाढलं जातंय ‘विष’!कुठे सांबारमध्ये ‘विष्ठा’!  
तर कुठे मटनच्या नावाखाली ‘बीफ’चा खेळ;

शहरातल्या नामांकित हॉटेल्सचा काळा चेहरा..!

अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने जनतेच्या आरोग्याशी जीवघेणी खेळ!

दिनचर्या न्युज :-
​[विशेष प्रतिनिधी, चंद्रपुर]
लखलखते दिवे, मखमली सोफे, वातानुकूलित (AC) यंत्रणेची थंड हवा आणि काचेच्या भिंतींच्या आड रचलेला ‘हायजीन’चा (स्वच्छतेचा) ढोंग... जर तुम्हीही शहरातील आलिशान रस -- राज..! रेस्टॉरंट्सचा हा झगमगाट पाहून तिथे जेवायला जात असाल, तर सावधान! शहरातल्या बड्या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरातून जे विदारक सत्य समोर आले आहे, ते केवळ तुमचे होश उडवणार नाही, तर तुमच्या पायाखालची जमीनही सरकवेल. शहरात अन्न सुरक्षा नियमांचा अक्षरशः चक्काचूर केला जात असून, प्रशासन मात्र ‘अर्थपूर्ण’ तडजोडीत मग्न असल्याचे चित्र आहे.
स्वयंपाकघर की नरक ?
​ज्या हॉटेलमध्ये आपण सहकुटुंब आनंदाने जेवायला जातो, त्या ठिकाणच्या पडद्यामागचे वास्तव अत्यंत भयावह आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नामांकित हॉटेल्सच्या सांबारमध्ये चक्क विष्ठा (Human/Animal Waste) आढळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. स्वच्छतेचे सर्व निकष धाब्यावर बसवून घाणीच्या साम्राज्यात अन्न शिजवले जात आहे.

काही हॉटेल्समध्ये मटनच्या नावाखाली ‘बीफ’ची विक्री
​धक्कादायक बाब म्हणजे, मांसाहारी खवय्यांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ केला जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये मटनच्या नावाखाली स्वस्त दरातील ‘बीफ’ (गोमांस) सर्रासपणे वापरले जात असल्याचे समजते. ग्राहकांना मटनचे पैसे आकारून त्यांना बीफ खायला घालण्याचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे. हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून धार्मिक भावना दुखा आहे.
अन्न  व औषध प्रशासन सुस्त कारभार आणि ‘अर्थपूर्ण’ मलाई!
​अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. हॉटेल मालक आणि अधिकारी यांच्यातील ‘मिलीभगत’मुळे या गंभीर तक्रारींकडे कानाडोळा केला जात आहे. केवळ सणासुदीला नावाला तपासणी करायची आणि उर्वरित काळात हप्तेखोरीत मग्न राहायचे, असाच प्रकार सध्या सुरू आहे. अन्न सुरक्षा मानके केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहेत.
​जनतेच्या आरोग्याशी खेळ
​शिळे अन्न, निकृष्ट दर्जाचे तेल आणि रसायनांचा वापर करून बनवलेले हे पदार्थ नागरिकांना गंभीर आजारांच्या खाईत लोटत आहेत. टायफॉइड, कॉलरा आणि पोटाचे गंभीर विकार जडण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे.
​“आम्ही हॉटेलच्या बाहेरील सजावटीला भुलतो, पण आत काय शिजतंय हे पाहत नाही. प्रशासनाने या नरकसदृश हॉटेलवर तत्काळ कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत.”— एका त्रस्त नागरिकाने आपल्या परिवारासह आस्वाद घ्यायला गेलेल्या त्या त्रस्त नागरिकांनी आप भीती कहाणी कथन केली!.