लिटिल मिस अँड मास्टर ,चंद्रपूर आयडल 2022,फॅशन शोचा जशीथ राजहंस खोब्रागडे विजेता !




लिटिल मिस & मास्टर ,चंद्रपूर आयडल 2022,फॅशन शोचा जशीथ राजहंस खोब्रागडे विजेता !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
लिटिल मिस & मास्टर ,चंद्रपूर आयडल 2022,फॅशन शोचा नाळ सिनेमा फेम श्रीनिवास पोकळे हा नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेता बालकलाकार याची प्रामुख्याने उपस्थिती.31 जानेवारी 2022 ला हा कार्यक्रम प्रियदर्शिनी सभागृह,चंद्रपूर येथे मंदा कोपुलवार ,विनय तितरे यांनी आयोजित केला होता ,या फॅशन शो करीता नाळ सिनेमातील बाल
कलाकार याला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .
या कार्यक्रमात माननीय पप्पू देशमुख ,शहर विकास आघाडी गट नेते आणि वडगाव प्रभाग नगरसेवक हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर अमेय काबरा सर, श्री संजय वैद्यजी,माजी नगरसेवक,सुशीला पोरेड्डीवार मॅडम,JCI राजुरा रॉयल प्रेसिडेंट ,
सीमा पाटील मॅडम जेष्ठ कवियत्री,नम्रता राऊत मॅडम,,उदय चाकोते सर ,अमरावती ,सुशील सहारे सर
राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक ,या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या फॅशन शो चे उत्कृष्ट संचलन नौशाद सिद्दीकी यांनी केले . एकूण 42 स्पर्धकांनी यात सहभागी घेतला होता ,सर्व स्पर्धक 3 ते 12 वर्षातील वयोगटातील होते,प्रामुख्याने फक्त लहान मुलांकरिता आयोजित केलेला हा चंद्रपुरातील पहिलाच फॅशन शो होता,कारण ही तसेच होते की या खास शो करीता येणारा पाहुणा बालकलाकार श्रीनिवास पोकळे याची उपस्थिती राहणार होती ,रॅम्प वर श्रीनिवास ची खूपच धमाकेदार एन्ट्री झाली प्रचंड उत्साही वातावरण ,पालकांचा जोरदार चिअर अप ,सर्व स्पर्धक मुलांना या छोट्या हिरो सोबत एक फोटो ची उत्सुकता ,तसेच खूप कमी गर्दी,कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आयोजकांनी कुठेच कमतरता ठेवली नाही , या फॅशन शो मधे ग्रुप ..वय ६ते९ च्या जशीथ राजहंस खोब्रागडे याला विनर चा बहुमान मिळाला.
,सहभागी आणि विनर छोटे छोटे मूल,मुलिंना विशेष टाईटल्स ,ट्रॉफी,प्रमाणपत्र ,देण्यात आले , परीक्षक म्हणून वीरश्री खोब्रागडे,शुभम गोविंदवार ,हे होते , या लहान मुलांच्या फॅशन शो मधे 3 ते 12 वयोगटातील
सर्वच मुलांनी खूप सुंदर पारंपारिक, फ़ंकी, वेस्टर्न या तीनही राऊंड चे सादरीकरण केले,
या नयनरम्य 3 तासांच्या फॅशन शो मधे श्रीनिवास पोकळे बालकलाकाराची शेवटपर्यंत उपस्थिती,तसेच श्रीनिवास आणि स्टेजवरील मान्यवर ,आयोजक यांच्या हस्ते सर्वच मुलांना सन्मानित करण्यात आले ,फोटो सेशन ही करता येऊ शकले,त्यामुळे छोटी मुलं खूप खुश झाले,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुशाल भागवत, कुनाल साखरे ,अक्षय मडावी ,मयूर खानेगावकर ,संदेश दुर्वे ,तौफिक सय्यद ,वैभव कोमरवार ,विकास मोरेवार साई फोटो ,गीता डांगरे,वैशाली फुलकर,रूपा मुत्तेलवार ,चैतन्या, आयेशा मेकओवर ,तनिष्का डिझाइनर , वैभव कडवे नागपूर ,उर्वशी नवलकर , अपेक्षा बाबरवाल जानवी चौधरी, दिव्यंका साखरकर ,सिमरन बोरकर ,खुशबू साखरकर , यांचे विशेष सहकार्य लाभले.