जिल्हा परिषद अनुकंपाधारकाची प्रस्तावित अंतरीम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द


जिल्हा परिषद अनुकंपाधारकाची प्रस्तावित अंतरीम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 16 फेब्रुवारी : अनुकंपा प्रतिक्षासूचीत समाविष्ट सर्व अनुकंपाधारकांना पदभरती-2021 चे अनुषंगाने अनुकंपा धारकांमधून नियुक्ती देण्याकरीता उपलब्ध प्रवर्गनिहाय पदे व अनुकंपा धारकांची शैक्षणिक अर्हता विचारात घेवून प्रस्तावित अंतरीम निवड यादी जिल्हा परिषद, चंद्रपूर कार्यालयाचे zpchandrapur.maharashtra.gov.in व enoticeboard-zpchandrapur.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर अंतरीम निवड यादीवर अनुकंपाधारकांना काही आक्षेप व हरकती असल्यास अर्ज व आक्षेपाशी संबंधीत आवश्यक दस्तऐवज दि. 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे सादर करावे. तसेच आपले आक्षेप व हरकती व्हॉट्सॲप द्वारे 9699519008 व 9422335313 या क्रमांकावर सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या आक्षेपाचा व हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व अनुकंपा धारकांनी नोंद घ्यावी.

तसेच सदर अनुकंपा पदभरती ही शासन निर्देशानुसार पारदर्शक पध्दतीने करण्यात येत असून या संदर्भात समाज माध्यम अथवा इतर माध्यमाने पसरविण्यात येणा-या कोणत्याही अपप्रचार व प्रलोभनाला अनुकंपाधारकांनी बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज