पालकमंत्र्यांच्या मूळ करंजी गावातील भूमिहीन कास्तकारांना वन विभागाची जबरदस्ती !



पालकमंत्र्यांच्या मूळ करंजी गावातील भूमिहीन कास्तकारांना वन विभागाची जबरदस्ती !

स्वातंत्रपूर्व काळापासून आम्ही वनजमिनी कसत असून आमच्यावर अन्यायकारक होत असलेली कार्यवाही टाळून आम्हाला कायमचे पट्टे ....


दिनचर्या न्युज :-

दिनचर्या :-
स्वातंत्रपूर्व काळापासून आम्ही वनजमिनी कसत असून आमच्यावर अन्यायकारक होत असलेली कार्यवाही टाळून आम्हाला कायमचे पट्टे . वन विभागाकडून नाहक त्रास दिला जात असल्याची व दमदाटी दिल्या जात असल्याची बाब समोर येत असून. कायमस्वरूपी वन हक्क मिळावे ,यासाठी वन जमीनीवर हक्क  करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी  पत्रकार परिषदेत   केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री   विजय वडेट्टीवार यांच्या  मूळ गावातील व्यथा,मौजा करंजी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर  येथील सर्व गरजू शेतकरी वर्ग
येथील रहिवासी (मूळनिवासी) आहोत. आम्ही इंग्रजकालीन मालगुजारी नष्ट झाली तेव्हापासून वनजमिनी कसत आहोत. आम्हाला कायमचे पट्टे मिळावे यासाठी आम्ही शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनेप्रमाणे तसेच दिशानिर्देशाप्रमाणे जुळेल ती कागदपत्रे गोंडपिपरी येथील तालुका कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेले आहेत. साथ अद्यापपर्यंत आम्हाला कायमचे पट्टे देण्यात आलेले नाहीत. असे असताना कुठलीही पूर्वकल्पना न देता बनविभागाचे कर्मचारी आमचे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून वहिवाट करत असलेल्या शेत शिवारात आल्याची माहिती मिळाली आहे. हि बाब आमच्यासाठी अन्यायकारक आहे. या जागे शिवाय आमच्याकडे इतर कुठलीही जागा नाही. सोबतच इतर कुठलीच उदरनिर्वाहाचे साधने नाहीत. मौजा करंजी येथील अंदाजे ऐंशी (८०) भूमिहीन कास्तकार इंग्रज कान्हापासून या जागेवर उदरनिर्वाह करीत आहेत. करंजी येथील या शेतकऱ्यांना वनजमिनी ह्या भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावे यांच्या उपस्थितीत वितरित झाल्याची ऐतिहासिक बाब नोंद असल्याचे पूर्वज सांगतात. आज घडीस वयाचे ९०-९५ वर्ष आयुर्मान असलेले आणि स्वतः अतिक्रमित असलेले शेतकरी हयात असून त्यांच्या सांगण्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्वकाळात भूमिहीन पट्टे देण्यात आले होते. यामधील काही लोकांना शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे देण्यात आले. यात प्रामुख्याने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील (ST) निवडक लोकांचा समावेश आहे. त्यांना सातबारा मिळाला. मात्र इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना अद्याप सातबारा मिळालेला नाही. यामुळे इतरांप्रमाणे आम्हा सर्वांना वनजमिनीचे पट्टे देण्यात येऊन वनविभागाकडून आमच्यावर अन्याय कारक होत असलेली कारवाई थांबवावी, आणि आम्हाला कायमच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची व्यवस्था करून द्यावी अन्यथा आमचे कुटुंब उघड्यावर येईल. असे पत्रकार परिषदेत उपस्थित समीर निमगडे, अशोक चिचघरे, महेंद्र कुनघाडकर बंडू  पोहनकर, सुरेश बक्षी, मारुती द्दूवारे. रामचंद्र लाटकर, शैलेश  रायपुरे, रामजी कुक्कडपवार , यांची पत्रकार परिषदेत उपस्थित होते.