जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्मानित.*
*आ. मुनगंटीवार यांनीही केला सत्कार.*
दिनचर्या न्युज
*आ. मुनगंटीवार यांनीही केला सत्कार.*
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर मनपाचे उपमहापौर व भाजपाचे युवा नेते यांना जेसीआय इंडिया या संस्थेच्या वतीने २०२१ चा आऊटस्टेडींग युथ पर्सन या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करीत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, चंद्रपूर महानगराचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महानगराचे संघटन मंत्री राजेंद्र गांधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, भाजपा हा ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण या धोरणावर चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे. याच धर्तीवर राहूल पावडे सुध्दा अनेक लोकोपयोगी कामे करून दलित, शोषीत, वंचित, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो हे कौतुकास्पद आहे. त्याच्या हातुन अशीच कामे पुढील आयुष्यातही होत राहो या शुभेच्छा आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
सत्काराला उत्तर देताना राहूल पावडे यांनी नम्रपणे हा पुरस्कार स्विकारत असल्याचे सांगीतले तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी आधीही काम करीत आलो आहे व पुढेही काम करीत राहील. कुठलाही पुरस्कार हा एकटयाच्या कामामुळे मिळत नसतो. संघटना आपल्या मागे उभी असावी लागते. अशी संघटना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन माझ्या मागे उभी आहे हे मी माझे भाग्य समजतो. यापुढेही मी सामाजिक कामे सुरूच ठेवीन, अशी ग्वाही राहूल पावडे यांनी दिले.