अ. भा. रिपब्लिकन पक्ष चंद्रपूर महानगर पालिकेच्या विरोधात लक्षवेधी आदोलन करणार - .






 अ. भा. रिपब्लिकन पक्ष
 चंद्रपूर महानगर पालिकेच्या विरोधात लक्षवेधी आदोलन करणार - . 

चंद्रपूर :

अ. भा. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात विविध समस्या घेऊन आंदोलन करण्यात येत आहेत.
अनेक वर्षांपासून आपण ऐतिहासिक चंद्रपूर नगरीत वास्तव्य करीत आहोत. सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व समस्या जसे रस्ता दुरुस्ती, नाल्या, स्वच्छता, आरोग्य, मालमत्ता कर, इत्यादी. या सर्व मुलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे चंद्रपूर महानगरपालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वरील समस्यांचा शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे.

त्याकरीता जनतेच्या प्रश्नाकडे चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीचौक येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे हे करणार असून त्यांच्या नेतृत्वात अनेक मागण्यांचे निवेदन महानगरपालिका प्रशासनास देण्यात येणार आहे.

निवेदनात चंद्रपूर शहरातील मालमत्ता करात महानगर पालिकेने लक्षणिय वाढ केलेली आहे. ती कमी करण्यात यावी. शहरातील अनेक वार्डात चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. तो नियमित करण्यात यावा. अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे शहरातील रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस वा पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी जीव सुध्दा गमवावा लागतो. तेव्हा तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील बऱ्याच वार्डात नाल्यांचे बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून प्रत्येक वार्डात नाली बांधकाम करून सांडपाणी वाहून जाण्याची योग्य •व्यवस्था करण्यात यावी. घंटागाडी महिला व पुरुष सेवकांना जुनी तुटलेली व खराब गाडीचे वहन करावे लागते. त्यामुळे त्यांन शारीरिक त्रास होतो व आजार बळावतात. तेव्हा महानगर पालिकेने त्यांना नविन इलेक्ट्रिक घंटागाडी पुरवावी. तसेच शहरातील संडे मार्केटला स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. बाबूपेठ उड्डाण पूलाच काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. आशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात येणार आहे. ह्या समस्या सोबत इतर ही मागण्याचा निवेदन प्रसाशनाला देण्यात येणार आहे.

ह्या पत्रकार परिषदे मध्ये अशोक निमगडे, विशाल अलोने, अशोक टेंभरे, राजस खोबरागडे, प्रेमदास बोरकर, सुरेश शंभरकर, नागसेन वानखेडे, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, माणिक जुमडे, दिलीप खाकसे, आनंद शेंडे, सचिन पाटील, गोल्डी सहारे, मनोज सोदारी, अशोक सागोरे, वामनराव चद्रिकपुरे, सिध्दार्थ शेंडे, रवि चीवंडे, संतोष पाटील, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, अश्विनी खोबरागडे,अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, लीना खोबरागडे, वर्षा घडसे, अंजली निमगडे, सुनीता बेताल, तृप्ती डोंगरे ,शिला कोवळे, परिनिता रामटेके, मनीषा कांबळे, कल्याणी चद्रागडे, अनिता जोगे, आशाताई चांदेकर.