जिल्ह्यात जल युक्त शिवार योजनेत करोडचा घोटाळा- राजीव कक्कड

जिल्ह्यात जल युक्त शिवार योजनेत करोडचा घोटाळा- राजीव कक्कड

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कृषी विभागात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सण 2018 ते 2019 या वर्षात कृषी विभाग या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ आणि गावातील पाण्याची पातळी वाढवण्याकरिता या योजना सुरू करण्यात आल्या या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 125 कोटी 34 लाख 17 हजार रुपयाचा निधी खर्च करून 10 391 लहान तलाव करण्यात आले. यासोबतच अन्य कामही केले गेले आहेत. ही योजना तत्कालीन फडणवीस सरकार तसेच पक्षाचे तपास यंत्रणा एग्रीकल्चर फायनान्सर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई ज्यांना तपास आणि मूल्यमापनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्यात जॉब एजन्सी ने आपला तपास तून असंख्य गैरप्रकार उघडकीस आणले होते. जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती ले लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे असी माहिती आज पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी  हिराचंद बोरकुटे, डी.के .आरिकर सुनील काळे, नितीन पिंपळशेंडे, अविनाश देशपांडे,  यांची उपस्थिती होती.
 संबंधित विभागाने काम झाले असल्याचे दाखवले असले तरी, ते मात्र, कागदावरच असून प्रत्यक्षदर्शींनी शेतकऱ्यांच्या शेतात नाहीत.   शासनाची दिशाभूल करून करोडो रुपये  वेरथ गेले असून या संबंधाची योग्य आय.ए.एस.स्थरावर  कसून चौकशी केल्यास फार मोठे घबाड बाहेर पडेल.
 जल युक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसील मध्ये कृषी विभाग, सिंचन विभाग, वन विभाग,  सार्वजनिक देखभाल विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, लघुपाटबंधारे विभाग या माध्यमातून  शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ अनेक गावातील पाण्याची पातळी वाढवण्याकरिता ह्या योजना शासनाने सुरू केल्या होत्या. परंतु या योजनेत करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झाल्याचे आरोप चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.