कंत्राटी विज कामगारांना ६० वर्षापर्यंत कायम स्वरूपी कामाची हमी दया - कृती समीती




विज कामगरांच्या खाजगीकरणाचे षडयंत्र रद्द करा

कंत्राटी विज कामगारांना ६० वर्षापर्यंत कायम स्वरूपी कामाची हमी दया - कृती समीती

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी विज उद्योगाचे खाजगीकरण करून विज उद्योगाला कवडी भावाने विकण्याचा केंद्र शासनानी राज्य शासनावर दबाव बनविला आहे. असे असले तरी आज पावेतो खाजगीकण होवु न देण्याच्या बोंबा ठोकरणारी राज्य सरकार गप्प का बसली आहे. अशा प्रकारचा सवाल कामगारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.

हया आंदोलनामध्ये कामगार कर्मचारी अभियंता व कंत्राटी कामगारांच्या बि.एम.एस. सोडली तर जवळपास सर्वच संघटना महाराष्ट्रातिल भाग घेणार आहे. हया आंदोलनामध्ये केंद्र सरकारणे लादलेले विजेचे खाजगीकरण रद्द करा. व कंत्राटी कामगारांना ६० वर्षापार्यत कायम स्वरूपी नौकरीची हमी दया हया एकमेव मागण्यांना घेऊन तिनही विज कंपनीचे कामगार कर्मचारी अभियंते व कंत्राटी कामगार २८ मार्च व २९ मार्च ला होणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ महिणा अगोदर विज उद्योगाला महाराष्ट्राचे उर्जा मंत्री मा. नितीनजी राहुत यांना नोटीस देऊन कल्पणा दिली होती. परंतू आज पावेतो मगरूर राज्य सरकार व उर्जा मंत्री व उर्जा विभागानी बैठकिला पाचरण संघर्ष समिती तसेच कंत्राटी कामगार कृती समीतीला केलेले नाही.




परंतू हया होवु घातलेल्या काम बंद संपात महाराष्ट्र अंधारात गेल्यास हयाची जबाबदारी मगरूर राज्य सरकार वर राहील. तेव्हा कामगार व महाराष्ट्रातील जनतेनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हया कामगार जनता विरोधी नितीचा जय्यत विरोध करावा व हया आंदोलनाच्या पूर्व तयारी साठी दि. २५.०३.२०२२ ला सि.टी.पी.एस. मेजर गेट समोर सायंकाळी ५ वाजता कामगार कर्मचारी अभियंते व कंत्राटी कामगारांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने वेळेवर उपस्थित राहावे. असेआव्हान एका पत्रकाद्वारे कॉ. वामन बुटले, श्री. निताई घोष, शंकर बागेसर, श्री. प्रमोद कोलारकर, प्रफुल सागोरे, श्री. युवराज महींत, श्री. सुरेश भगत, श्री. सदानंद देवगडे, अरून नाकट यांनी केले आहे.