अखेर "वसंत" फुल सोडून काँग्रेसमध्ये फुलला!




... अखेर "वसंत" फुल सोडून काँग्रेसमध्ये फुलला!

हा माझा प्रवेश नसून प्रत्येक नागरिकावर झालेल्या अन्याचा प्रवेश आहे. वसंत देशमुख

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय जनता पार्टीच्या मृगजळ असलेल्या नगरसेवक वसंत देशमुख यांनी अखेर भाजपाला राम राम करू काँग्रेसमध्ये सिताराम मनत प्रवेश केला. आतापर्यंत कुठल्या पक्षात 'वसंता' जाईल याची वार्ड वासियांना नहीतर शहरातील जनतेला आस लागली असताना. अखेर वसंत देशमुख यांनी कमळाच्या चिखलातून निघून काँग्रेसचे हात मजबूत केले. भारतीय जनता पक्षात न्याय मिळत नसल्याचा  संताप व्यक्त करीत. हा माझा प्रवेश नसून प्रत्येक नागरिकावर झालेल्या अन्यायाचा प्रवेश आहे. पक्ष काँग्रेस पक्ष हा मनाने विचाराने मोठा असून सर्व धर्म घेऊन चालणारा पक्ष आहे. म्हणून मी आज  माझे सहकारी मित्र   नगरसेवक सतीश घोडमारे  यांच्यासह    नगरसेवक  वसंत देशमुख    यांनी रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश   केला आहे  .
 महानगरपालिकेत अनेक पदावर राहिलेले देशमुख यांनी आता काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ काम  करुण , काँग्रेस पक्षाला बळकट करण्या करण्यासाठी आपण एकनिष्ठ राहणार  अशी ग्वाही आज भव्य दिव्य झालेल्या प्रवेश   कार्यक्रमात दिली  . यापूर्वी भिवापूर वार्डात  झालेल्या खासदार  चषकात वसंताचा प्रवेश होणार असल्याचे निश्चित असताना मात्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना एकत्र येण्याचा दिवस निश्चित होत नसल्याने यांचा प्रवेश लांबणीवर जात होता. मात्र यामुळे प्रसार माध्यमात वसंताचा पोपट  होणार नाही ना !अशा प्रकारच्या अफवाही उडवल्या जात होत्या!
 यावेळी जिल्ह्याचे  लोकसभा   क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार, वरोरा भद्रावती  आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसचे नगरसेवक,  शहरातील काँग्रेस कार्यकर्ते,  भिवापुर वार्डातील ज्येष्ठ नागरिक व महिला यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमात नागरिकांची उपस्थिती होती.
 पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले   की, वसंता आता तू महानगरपालिकेत नेतृत्व करणार असून दोघांचाही प्रवेश हा भाजपला संपवण्यासाठी असेल.   चिखलातून  निघालेला कमळ ,आता काँग्रेसमध्ये वसंत  फुलला आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे. मनपात सत्ताधारी निधी काँग्रेसचा वापरतात मात्र बोर्ड भाजप आले आपल्या नावाने लावतात. यालाच म्हणतात "मला  पहा फुले वाहा"! आताही  फुले यांच्या वर टाकून यांना श्रद्धांजली दिली पाहिजे. आणि भाजपाला हद्दपार केले पाहिजे. बाबुपेठ उड्डाणपूल तिकडून काम केले ईकडून काम केले. मधामध्ये सोडून दिले. याचाच अर्थ  पुलावरून चढा आणि रेल्वे पटरीवर जिव सोडा!  असे भाजपावर खडे बोल सुनावले. ईरई नदी, रामाळा तलाव, आणि चंद्रपूरची वारसा असलेले पुरातन विभागाचे किल्ले पुनर्जीवित   करून सुशोभित केले जातील. चंद्रपुरात होत असलेली अमृत योजना यावरूनच यांनी खडे बोल सुनावले. भाजप सरकारच्या काळात होत असलेली महागाई पेट्रोल, खाद्यतेल,  गॅस,   रस्त्यांची दुर्दशा, या  केंद्र सरकारने कळस गाठला आहे.  
 ओबीसीचे आरक्षण हे केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे  अडकलेले आहे.  जातीय जनगणना जात निहाय केले जात नसल्याने ओबीसीला आरक्षणापासून वंचित केल्याचे षड्यंत्र केले जात आहे. असा घणाघाती आरोपही   पालक मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केला. एवढे असतानाही आपण  भाजपलाच मतदान करायचं काय.?  प्रश्न उपस्थित करून आता वसंत ,सतीशला आपला  मत द्या ! आम्ही तुम्हाला हात देऊ कुठल्याही व्यवस्थेला कमी पडू देणार नाही.  वसंतराव सारखा सच्चा कार्यकर्ता प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता भाजपात जागा  का नव्हती! कारण भ्रष्टाचाराला चालना  देणारा वसंता नव्हता म्हणून भाजपनी  शळबुद्धीने बाहेर केले . एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आता वसंताची ओळख निर्माण झाली आहे.असे
पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांनी प्रवेश कार्यक्रमात बोलले.