विद्यार्थ्याची लूट करणाऱ्या पॅरामाउंट कॉन्व्हेन्टची मान्यता रद्द करा - आम आदमी पक्ष
तक्रारीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी केली चौकशी RTE 25 % प्रवेशाअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून रक्कम घेतल्याचे उघड
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेन्टमध्ये RTE 25 % प्रवेशाअंतर्गत प्रवेशित वर्ग पहिली ते ८ वी पर्यंतच्या विद्याथ्र्यांकडून शुल्क घेत असल्याबाबतची तक्रार आम आदमी पक्षाचे शहर सचिव राजु कुळे यांचेकडे पालकांनी दिली होती. तात्काळ त्यांनी हीबाब जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे तसेच कोषाध्यक्षः भिवराज सोनी यांचे निदर्शनास आणून दिली.
लगेच शिक्षण अधिकारी यांचेकडे तक्रार करन्यात आली. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत RTE 25 % प्रवेशाअंतर्गत प्रवेशित विद्याथ्र्यांकडून रक्कम घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या पॅरामाउंट कॉन्व्हेन्टची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, घेतलेले पैसे तात्काळ परत करावे पालकांना धमकावणे थांबवावे अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेन्टमध्ये इयत्ता १ ते 8 वी पर्यंतच्या वर्गासाठी आरटीई म्हणजेच शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागा आहेत. त्यात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याकडून बळजबरीने धमकी देऊन चुकीच्या पद्धतीने प्रत्येक पालकांकडून पैसे वसुल करण्यात येत आहे. याबाबतीत याअगोदर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. मात्र, दखल घेण्यात न आल्याने आम आदमी पार्टीने संबंधीत शाळा व्यवस्थापनावर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चंद्रपूर यांना RTE 25 % प्रवेशा अंतर्गत प्रवेशित विद्यार्थाकडून शुल्क घेत असल्याबाबतची तक्रारीवर तात्काळ चौकशी करण्याची सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केली. त्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेन्टच्या व्यवस्थापनाने विद्यार्थाकडून बेकायदेशीररित्या लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा न दिलेल्या विद्याथ्र्यांची तात्काळ परीक्षा घेण्यात यावी आणि RTE 25% प्रवेशा अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम संबंधीतास तात्काळ परत करून रक्कम परत केल्याचा अहवाल आवश्यक दस्तऐवजांसह गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चंद्रपूर यांच्यामार्फत तात्काळ सादर करण्याचे शाळेला सूचित केले आहे.
बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेन्ट चे व्यवस्थापन अत्यंत मुजोर आहे. अधिकारी आमच्या खिशात आहेत. त्यामुळे कितीही तक्रारी करा. आमचे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही. अशा तोऱ्यात वावरत आहेत. अशा गरीबाची लूट करून स्वतःची मालमत्ता वाढविणाऱ्या पॅरामाउंट कॉन्व्हेन्टची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यानी केली आहे. जर आठ दिवसात मान्यता रद्द झाली नाही तर मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आज झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला .
पत्र परिषदेला जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर सचिव राजू कुळे सोशल मीडिया प्रमुख राजेश चेटगुलवार, संतोष बोपचे सिकंदर सागोरे, अॅड. सुनीताताई पाटील सुनिल सदभय्या सुजाता बोदेले, चंदु माडुरवार, अश्रफ सय्यद तथा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.