महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेत महात्मा ज्योतिबा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा महत्त्वाची




महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेत महात्मा ज्योतिबा फुले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा महत्त्वाची

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत
एक जुटीने घेतली संविधानाची प्रतिज्ञा.

अंनिस च्या प्रबोधन कार्यक्रमात डॉ. राहुल साळवे यांना आधारस्तंभ कार्यकर्ता पुरस्कार.

जादूटोणाविरोधी कायदा माहिती व पोस्टर्स प्रदर्शन.

चमत्कारांचा भांडाफोड (पैशांचा पाऊस) व

ज्योतिबा चा संघर्ष प्रबोधनपर नाट्यप्रयोग सादर.

दिनचर्या न्युज:-
चंद्रपूर:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा कार्यकारणी व उत्तर नागपूर शाखा आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल ते 18 एप्रिल 2022 (सामाजिक समता सप्ताह) जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून निघून वर्धा- वरोरा- भद्रावती- चंद्रपूर -मुल- ब्रह्मपुरी- नागभिड -गोंदिया -भंडारा- रामटेक -नागपूर असा पूर्व विदर्भाचा चार दिवसीय जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा चळवळीचे गीते महापुरूषा वरची प्रबोधनात्मक गीते सादरीकरण करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आधारस्तंभ डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची प्रेरणा घेऊन युवा पिढीला जनजागरण करीत पुढे निघाली आहे. प्रबोधन चळवळीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भद्रावती येथे सामाजिक समता सप्ताह अंतर्गत जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेचे आयोजन 15 एप्रिल 2022 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व्यासपीठावर सायंकाळच्या प्रहरी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जनमंच नागपूर सदस्य रवींद्र तिराणिक तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य रामभाऊ डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, उत्तर नागपूर ,कार्याध्यक्ष देवानंद बडगे, उत्तर नागपूर, पदाधिकारी चंद्रशेखर मेश्राम, आनंद मेश्राम, आधारस्तंभ कार्यकर्ता पुरस्कार सत्कारमूर्ती बाल रोग तज्ञ डॉ. राहुल साळवे भद्रावती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, एँड़ मिलिंद रायपुरे, सुनील आवारी, विशाल बोरकर ,कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका शारदा खोबरागडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रबोधन यात्रेच्या सुरुवातीला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र तिराणिक व राज्य कमिटीचे सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी पुष्पमाला अर्पित करीत अभिवादन केले. प्रसंगी प्रमुख मान्यवर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रबोधन यात्रेत राज्यघटनेची उद्देशिका व संविधाना प्रतिज्ञा वाचन करून उपस्थित सर्वांना एकजुटीने शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमात आधारस्तंभ कार्यकर्ता पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन राज्य कमिटीच्या वतीने बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल साळवे यांना सन्मानपत्र फेम देऊन गौरव करण्यात आला.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रबोधन यात्रेचा मुख्य उद्देश 21 ऑगस्ट 2021 ते 6 सप्टेंबर 2021 पर्यंत 19 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील चार घटनेमुळे संशयाच्या भुताने अमानुषता कळस गाठला होता जादूटोण्याच्या संशयावरून मारहाणीच्या अनेक घटना घडल्या व सबंध चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता. व आताही अनेक घटना संशयाच्या भोवर्‍यात जादु टोने च्या नावाखाली अनेक प्रसंग घडताना दिसत आहेत. संदर्भीय बाबी संदर्भात सदर परिसरात जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती व्हावी जनजागरण व्हावं हा दृष्टीकोन बाळगून सदर जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले अशी भूमिका याप्रसंगी राज्य कमिटीचे सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी आपल्या विचारातून अंनिस च्या माध्यमातून मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आपली भूमिका ठाम पणे मांडताना रवींद्र तिराणिक म्हणाले "परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात" लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज ,सम्राट अशोक, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत तुकाराम यांच्यासारखे विचारवंत का येत नाही? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर अधिराज्य करेल असे विचार तिराणिक यांनी मांडले.
अंधश्रद्धे वरील प्रबोधन दोन्ही महापुरुष यावरील प्रबोधनात्मक गीते, जादूटोणा विरोधी कायदा, पोस्टर्स प्रदर्शन व मार्गदर्शन, चमत्कार सत्यशोधन व प्रबोधन (चमत्कारांचा भांडाफोड), नाट्यप्रयोग 1- बाबांचा चमत्कार सुशिक्षित मुलीवर बलात्कार, नाट्यप्रयोग 2 ज्योतिबा का संघर्ष असा भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रम अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सादरीकरण केला. जनतेच्या मनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी बालक युवक-युवती व ज्येष्ठ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विविध साखळी प्रयोग केले. यात देवानंद बडगे. आनंद मेश्राम, श्वेता पाटील, विजयकांत पानबुडे, अजय रहाटे, राखी घुटके, आशुतोष टेंभुर्णे, समयक मेश्राम, माधुरी मेश्राम, जानवी मेश्राम, चंदा मोटघरे, प्रिया गजभिये, निक्की बोदाडे, पुष्पा घोडके, वंदना लांजेवार, तनुष्री आधी कार्यकर्ते प्रबोधन यात्रेत सहभागी असून एकूण वीस जणांचा समूह जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेत जनजागरण करीत आहे .
भद्रावती येथे आयोजित प्रबोधन यात्रेचे सूत्रसंचालन ललिता दुर्योधन यांनी केले तर प्रास्ताविक नामदेव रामटेके यांनी केले आभार प्रदर्शन -कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका शारदा खोब्रागडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लाॅर्ड बुद्धा टीव्ही चॅनल नागपूर प्रतिनिधी विकास जीवने, महादेव कोल्हे, मनोज मोडक, सुरेखा रामटेके, संजय कोलते. वनिता घुमे, गजानन घुमे, डि .के .रामटेके, रवींद्र वानखेडे, सुभद्रा वाघमारे, चेतना भगत, रत्नाकर साठे, संतोष रामटेके, सरिता मानकर, जी .के .सातपुते, शोभा चंदनखेडे, नरेंद्र रंगारी, श्रीधर भगत, अनिता भजभूजे अधिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.