सावधान:, उष्णतेचा पारा वाढतोय, आपणही होऊ शकता ... बळी!

सावधान:, उष्णतेचा पारा वाढतोय, आपणही होऊ शकता ... बळी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
गेल्या काही दिवसापासून सूर्याचा प्रकोप वाढला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने 46 अंश सेल्सिअस तापमानाची वर नोंद झाली असून दर दिवसाला तापमान वाढत आहेत. जगातील सर्वात उष्ण पंधराशे शहरात चंद्रपूरचे दुसऱ्या क्रमांकावर नाव नोंदले जात आहे. विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंत चंद्रपूर चे तापमान सर्वाधिक ठरले आहे. मागील दोन दिवसापासून सतत तापमानाची वाढ होत आहे. मे महिना प्रारंभ होण्यापूर्वी शुक्रवारी तापमानाने 46अंशाचा टप्पा ओलांडल्यामुळे येणाऱ्या आठवड्यात पुन्हा नागरिकांना उष्णतेच्या दहाकाची झळ सोसावी लागणार आहे. हवामान विभागाने यापूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यातील अलर्ट जारी केला आहे. दर दिवसाला सूर्य आग ओकत असल्यामुळे सर्वसामान्यांपासून सर्व जनता हवालदिल झाले आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच लग्न सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात मुहूर्त सुरू असल्याने. जिकडे तिकडे लग्नसोहळ्याची धामधूम सुरू आहे. मात्र यावर प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हापासून बचावासाठी शक्यतोवर दुपारी घराबाहेर निघण्याचे टाळावे, थंड पेय, इमर्जन्सी काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा पुन्हा काही दिवस उन्हाच्या तडाख्यापासून वाचायचे असेल तर,
सावधगिरीचा इशारा बाळगला पाहिजे, नाहीतर आपणही या उन्हाचा बळी ठरू शकता!