स्व.यशवंतराव तायडे बालोद्यान व श्री शिव -गणेश मंदिर लोकार्पण सोहळा थाटात..




स्व.यशवंतराव तायडे बालोद्यान व श्री शिव -गणेश मंदिर लोकार्पण सोहळा थाटात..

दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर :-
आज दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता स्व. यशवंतराव तायडे व श्री शिव गणेश मंदिराचा लोकार्पण ठक्कर नगर, पठाणपुरा येथे चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नंदू नागरकर नगरसेवक, वसंत देशमुख नगरसेवक, खुशबु चौधरी नगरसेविका, मंगला आखरे नगरसेविका, सतिश घोनमोडे नगरसेवक व दानशूर प्रा. रतन गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर शहरातील अत्यंत सुंदर व स्वच्छ ठक्कर कॉलनी सर्वांना परिचीत आहे. जवळपास 15 हजार स्केअरफुट च्या खुल्या जागेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या आमदार निधीतून 13 लाख रूपये खर्चून भव्य व सुंदर रंगमंच निर्माण करून आबाळ वृध्द व बालगोपालांना समर्पित केला. तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना म्हणाले की, या परिसराला अजूनही सुंदर करण्याकरिता निधी कमी पडू देणार नाही. गरजू व गरीब विद्यार्थ्यांकरिता स्व. यशवंतराव तायडे बालोद्यानात एका सुंदर अश्या अभ्यासिका निर्माण करू, जेणेकरून उच्च शिक्षणाकरिता लागणारी पुस्तके व अभ्यासाकरिता पोषक वातावरण निर्माण करू.
प्रमुख पाहुणे नंदू नागरकर व वसंत देशमुख यांनी आपल्या भाषणातून येत्या 10 दिवसात ठक्कर नगरमध्ये हायमास्ट लावून संपूर्ण परिसरात लखलखाट होईल असा विश्वास देखील रहिवाश्यांना दिला. ठक्कर कॉलनीतील सर्व ज्वलंत समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचा संकल्प सोडला.
स्व. यशवंतराव तायडे यांनी ठक्कर नगर कॉलनीचा कायापालट करण्याकरिता अविरत परिश्रम घेतले. परंतू भव्य दिव्य लोकार्पण सोहळयाला त्यांच्या दुर्दैवी मृत्यमुळे उपस्थित नसल्याची खंत दानशूर रतन गांधी व कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी बोलून दाखविली. या कार्यक्रमाला जन विकास सेनेचे पप्पू देशमुख व चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषणकुमार फुसे प्रामुख्याने उपस्थित होते. श्री शिव गणेश मंदिराला या प्रभागाचे नगरसेवक नंदू नागरकर व वसंत देशमुख यांनी चंद्रपूर महानगरपालिका निधीतून सौंदर्यीकरणाचे कार्य पूर्ण करून दि. 3 एप्रिल 2022 रोजी लोकार्पण सोहळयामध्ये नागरिकांना दर्शनासाठी खुले करून समर्पित केले. पुरातन श्री शिव श्री गणेश, श्री हनुमान, श्री महादेव या मुर्त्यांची स्थापना करण्यात आली. श्री शक्ती उपाध्याय परिवार तर्फे श्री विठ्ठल रूखमाई मूर्तीची ही जिर्णाेध्दार पुजा करून स्थापना करण्यात आली.
दि. 2 एप्रिल 2022 ते दि. 3 एप्रिल 2022 पर्यंत मंगलमय वातावरणात यथासांग पुजा अर्चा करण्यात आली. जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळयानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकार्पण सोहळयाचे प्रास्ताविक सुनिल तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिहर भांडवलकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सफल आयोजन करण्याकरिता शंभू अडावतकर, भाउराव सोनटक्के, वामनराव आमटे, राहुल अदेंकीवार, विठ्ठलराव मुडपल्लीवार, सतिश पैठे, जयंत जोशी, रमण घरोटे व सहका-यांनी अथक परिश्रम घेउन कार्यक्रम सफल करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न केले.

दिनचर्या न्युज