सीएचएल हॉस्पिटलवर मनपाची कृपादृष्टी, 3 दिवसात निलंबन घेतले मागे;




सीएचएल हॉस्पिटलवर मनपाची कृपादृष्टी, 3 दिवसात निलंबन घेतले मागे;

हॉस्पिटल रुग्ण भरती प्रकरण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
येथील सीएचएल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे 8 दिवसांसाठी केलेले निलंबन मनपाने बॅकफूटवर जाऊन मागे घेतल्याने सीएचएल हॉस्पिटल येथील बाह्य रुग्ण विभाग (ओपिडी) निलंबन कालावधी संपण्यापूर्वीच 3 दिवस पहिले पूर्ववत सुरू झाले आहे. मनपाची ही कृपादृष्टी कुणाच्या आशीर्वादाने ? यावर शहरात चर्चा
सुरू आहे. हृदयरोगावर उपचारार्थ डॉ. रोहन आईचवार यांच्या सीएचएल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे 'महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी प्रमाण पत्र' मनपाने 4 मे ला पुढील 8 (11 मे) दिवसांसाठी निलंबित केले होते. डॉ. रोहन आईंचवार यांनी बेकायदेशीररित्या कोविड रुग्णांची भरती केली होती. म्हणून ही कारवाई आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अतुल चुटकी व लिपीक सतीश आलेणे यांनी केली. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांचा उपचार करणाऱ्या सर्व हॉस्पिटलची परवानगी रद्द करीत, नियमित सराव करण्याच्या सूचना
केल्या होत्या. परंतु डॉ. आईचवार व डॉ. नगराळे (बाबूपेठ) यांच्याकडे कोविड रुग्ण असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला मिळाली. होती. मनपाच्या आरोग्य विभागाने याची पडताळणी केली असता तथ्य आढळून आल्यावर 24 एप्रिल 2022 ला डॉ. आईचवार यांना 25 हजार रु दंड ठोठावून 8 दिवसांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद करण्यात आली व नोंदणी प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले. निलंबन कालावधीत भरती असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू राहील, असेही मनपाने स्पष्ट केले होते. 11 मे पर्यंत निलंबन केले असतांना सोमवार 9 मे पासून बाह्यरुग्ण (ओपिडी) सेवा 7 पूर्ववत करण्याची परवानगी मनपाने बहाल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


कसा आला प्रकार उघडकीस

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, सीएचएल हॉस्पिटल येथे काही कोविड रुग्णांवर उपचार सुरू होता. परंतु याची माहिती प्रशासनाला दिली नव्हती. रुग्ण दगावले तेव्हा मृतकाचे शव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वाधीन करण्यात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.अशाप्रकारे अनेक रूग्णाच्या जिवाशी या रूग्णालयात खेळखंडोबा झाला असेल? जर हा रूग्ण दगावला नस्ता तर, परवानगी नसताना कोविड रूग्णाच्या आर्थिक फायद्यासाठी सर्रास लुठ होत होती!
त्या वेळी अनेक रूग्णालयावर कारवाई झाल्या!
डॉ. विनोद नगराळे यांच्यावर दंडात्मक कारवाई
मनपाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर येथील डॉ. विनोद नगराळे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करण्यात आली. डॉ. नगराळे यांच्याकडे 2 कोविड रुग्ण आढळल्यावर प्रशासनाने खडसावले असता त्या रुग्णांना क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये स्वानातरित करण्यात आले. आणि 10 हजार रु दंड वसूल करून मनपाने काढता पाय घेतला.
कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. प्रशासनाने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी दिली. याचा सर्वाधिक लाभ या रुग्णालयांना झाला. काहींन तर अवाजवी दर आकारून रुग्णांना जेरीस आणले. असाच काहीसा प्रकार डॉ. बुक्कावार हॉस्पिटल येथे घडला. एका रुग्णाच्या परिवाराने मनपात तक्रार केली. प्रकरा लेखापरीक्षणासाठी गेले. तक्रारीत तथ्य आढळल्याने मनपाने 'त्या' रुग्णाचे जास्त घेतलेले पैसे 7 दिवसाच्या आत (10,500 रु.) परत करण्याचे निर्देश डॉ. अमरीश बुवकावार यांना दिले. त्यांनी ते परत केले. डॉ. बुक्कावार यांनाही चपराक बसली.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा बसला फटका कोविंडच्या रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून कडक नियम करण्यात आले. पण रुग्णसेवेच्या नावाखाली बरेच काही घडले. या कायद्याच्या कचाट्यात डॉ. रितेश दीक्षित हॉस्पिटल, डॉ. कोलते हॉस्पिटल, डॉ. अमित मुरके हॉस्पिटल व डॉ. अनिल माहूरवार यांना पूर्वीच फटका बसला, कोलते व मुस्केंना पैसे परत करावे लागले तर डॉ. दीक्षित यांचे कोविड रुग्णालय बंद करण्यात आले. डॉ. माइरवार यांना पीप किट जाळली म्हणून 2000 रु. दंड भरावा लागला.
मात्र सीएचएल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे 8 दिवसांसाठी केलेले निलंबन मनपाने बॅकफूटवर जाऊन मागे घेतल्याने सीएचएल हॉस्पिटल येथील बाह्य रुग्ण विभाग (ओपिडी) निलंबन कालावधी संपण्यापूर्वीच 3 दिवस पहिले पूर्ववत सुरू झाले आहे. मनपाची ही कृपादृष्टी कुणाच्या आशीर्वादाने ? यावर शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत . हृदयरोगावर उपचारार्थ डॉ. रोहन आईचवार यांच्या सीएचएल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे 'महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी प्रमाण पत्र' मनपाने 4 मे ला पुढील 8 (11 मे) दिवसांसाठी निलंबित केले होते. पण असे काय झाले! सीएचएल मल्टी स्पेशालिटीहॉस्पिटल तिन दिवसात सूरू झाले?