चंद्रपूर जि. प. गत संसाधन केंद्र पाणी वि .स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणत्या आधारावर ?




चंद्रपूर जि. प. गत संसाधन केंद्र पाणी वि .स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणत्या आधारावर ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील 12 ,13 ,14 या तारखे मध्ये काही विभागाच्या बदल्या चे परिपत्रक आदेश काढण्यात आले आहेत .त्या परिपत्राकाच्या आदेशानुसार विविध वेगवेगळ्या विभागाच्या बदलासंदर्भात विनंती अर्ज तसेच तालुका वाहीज आपसी बदल्या संदर्भात जिल्हा परिषद मध्ये बदल्या होत असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.तसेच याच जिल्हा परिषद मधल्या गत संसाधन केंद्र पाणी वि स्वच्छ विभागातील काही कंत्राटी कर्मचा-यांनी
यासंदर्भात अर्ज करण्यात आले आहे. मात्र
अर्ज कश्याच्या आधारावर करण्यात आले आहेत.
हा मात्र संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागातील कंत्राटी कर्मचारी असून प्रत्येक पंचायत समितीच्या स्तरावर यांचे एक विभाग कार्यरत असून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम बघत आहेत .अशातच त्यांना बदलीचे आदेश देणे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कोणत्या आधारावर बदल्या करण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कुठल्या आधारावर बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद चा मनमानी कारभार चालू असल्याने
हा चर्चेचा विषय असून तात्काळ अशा प्रकारच्या बदल्या करण्यात येऊ नये अशा प्रकारची संबंधित विभागाकडून मागणी होत आहे. बरेच कंत्राटी कर्मचारी एका विभागात दहा वर्षापासून त्यांनी नियमाप्रमाणे आतापर्यंत या विभागात प्रामाणिक काम केले असून त्यांना आतापर्यंत शासनाकडून समाविष्ट करण्यात आलेले नाही. यासंदर्भात बीआरसी यांच्या सेवा बाबत न्यायालय प्रक्रिया सुरू असून निर्णय येईपर्यंत कुठल्याही बदल्यांचे आदेश देता येत नाहीत असा आदेश असताना कुठल्या आधारावर विनंती अर्ज स्वीकारला जात आहेत.