आमच्या मुलांचा अपघात नसून 'तो'प्रेमप्रकरणातून झालेला घातपात आहे- वडिलांचा आरोप
आमच्या मुलांचा अपघात नसून 'तो'प्रेमप्रकरणातून झालेला घातपात आहे- वडिलांचा आरोप

सावली पोलिसांची भूमिका संशयास्पद..


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्हा चंद्रपूर व्याहाड बुज. ते मोखाडा पेट्रोल पंप जवळ तुमच्या मुलाचा अपघात झाला असे सांगण्यात आले होते. मात्र आम्हाला संशय असून तो अपघात झालेला नसून , प्रेम प्रकरणातून घातपात घडवला गेला असल्याचा आरोप आज मृतकाच्या वडीलांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दिनांक 15 /11 /2021रोजी चंद्रपूर-गडचिरोली हायवे महामार्गावर पेट्रोल पंप कडे पहाटे साडेचार वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली, तेव्हा दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र अक्षय प्रकाश रामटेके याला किरकोळ जखम झाल्याने गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सोबत असलेले अंकुश सोयाम व दीपक दादरिया या दोघांचा मृत्यू झाला होता.
सावली पोलिसांची भूमिका संशयास्पद
घटना घडून सहा-सात महिन्याचा जवळपास कालावधी होत असताना सुद्धा सावली पोलिसांनी आतापर्यंत घटनेची सखोल चौकशी केली नसल्याचा आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेत मृतक मुलांचे पालक देवाची उद्धव सोयाम व देवीलाल दादोरिया, सामाजिक नेते गोपाल रायपुरे यांनी केला आहे. ते म्हणाले की आतापर्यंत ना त्या अपघातातील गाडीचा पत्ता लागला. संबंधित मृतक मुलाच्या मोबाईल सुद्धा मिळालेला नाही, जो मुलगा या प्रकरणात वाचला गेला त्याचे बयान सुद्धा आमच्यासमोर नोंदवल्या गेले नाही. सोबत  असणारा मुलगा हा संशयात असून, त्याने त्याच दिवशी  आपला मोबाइल न आणता भावाचा मोबाईल घेऊन आला, मित्राने सकाळी फोन केला असता माझी सायकलीत हवा नसल्याचे सांगून मी येत नाही म्हणून टाळले, परत पाच मिनिटांनी येत आहे म्हणून सांगितले. या कालावधीत त्यांच्या मोबाईल वरील संभाषण आणि झालेली घटना यात फारसा तफावत असून , दोघांचच्याही झालेला अपघातात जवळपास  अंशी फुटाच्यावर, अंतरावर  झाले असून दोघांच्याही डोक्याला जबर जखमी असून एकाला  दोन्ही पायाच्या मध्ये  चिरला गेल्याचे  जखमा आढळून येत आहे. एवढेच नाही तर संबंधित प्रेम प्रकरणात असलेल्या मुलींचे   बयान नोंदविण्यात आले नाहीत. अपघात झाला असेल तर संबंधित गाडीचे शोध घेऊन त्या गाडीला जप्त करण्यात आली नाही. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तशी माहिती आम्हाला द्यावी. त्याच्या मोबाईल मध्ये अस्तित्वात असलेल्या क्लीपिंगच्या आधार घेऊन पोलीस विभागाने तपास करून संबंधित   झालेल्या घटनेला निसंकोच  न्याय द्यावा . अशी मागणी आज पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निवेदनासह झालेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
 आतापर्यंत  पोलिसांनी केलेली  चौकशी संशयाच्या भोव-यात  असल्याचा आरोप  केला असून याप्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.