५ जूनला चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन




जूनला चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर. पर्यावरण संवर्धन व विकास समिती व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2022 ला राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन केले आहे या पर्यावरण संमेलनासाठी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय भाऊ वडेट्टीवार, चंद्रपूरचे खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर, मा. मनोहरजि चंद्रिकापुरे अध्यक्ष रो. ह. यो. महाराष्ट्र शासन व आमदार चंद्रपूरचे आमदार माननीय किशोर भाऊ जोरगेवार तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी व विचारवंत प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांना निमंत्रित केले आहे.
आम्ही गेल्या २० वर्षापासून पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून त्यानिमित्त निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण व पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशनही संमेलनात करण्यात येणार आहे.तर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि UPSC,MPSC दहावी ,बारावी किंवा इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे
तरी 5 जून 2022 ला चंद्रपुरात होऊ घातलेल्या पर्यावरण संमेलनात मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष डी. के. आरिकर व सचिव हरीश ससनकर यांनी केले आहे.