सोमवार दि. ६ जूनला खासदार सुप्रियाताई सुळे चंद्रपूर दौऱ्यावर.

सोमवार दि. ६ जूनला खासदार सुप्रियाताई सुळे चंद्रपूर दौऱ्यावर.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
६ जूनला सकाळी १०.३० वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास मानवंदना देण्याचा कार्यक्रम आद. सुप्रियाताई सुळेंच्या उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी १०.३० वा. शिवाजी चौक, पटेल हायस्कूल समोर, चंद्रपूर, उपस्थित राहावे. दु ४ ते ५ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या भेटीगाठी - निवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे, तरी पक्षाच्या सर्व विभागाच्या/सेलच्या, तालुका/शहर/विधानसभा अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दू. ४ ते ५ या वेळेत विश्रामगृह चंद्रपूर येथे हजर राहावे ही विनंती.

राज्याच्या दौऱ्यावर असताना भेटायला येणारे
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियांवरील प्रेमापोटी विविध भेटवस्तू आणतात. यामध्ये पुष्पगुच्छ, हारतुरे, छायाचित्रे, फोटो फ्रेम आदींचा समावेश असतो.
हे आपल्या प्रेमाचं प्रतिक आहे. आपल्या या निखळ भावना आणि प्रेमाबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे की, भेटवस्तू आणायच्या असतील तर कृपया त्या पुस्तकांच्या स्वरुपात आणाव्या. पुस्तकांमुळे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रसार होतो.
आपण भेट दिलेली पुस्तके वाचनालयांमध्ये जातील याची आम्ही दक्षता घेऊ, याचा फायदा अनेक गरजू मुलामुलींना होऊन वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार होऊ शकेल.
धन्यवाद,
सुप्रिया सुळे