लग्नाचे आमिष दाखवून वारंवार घटस्फोटीतेवर अत्याचार, आरोपीला पोलिसाकडून अभय ,पत्रकार परिषदेत पीडितेची न्यायाची मागणी!
लग्नाचे आमिष दाखवून वारंवार घटस्फोटीतेवर अत्याचार, आरोपीला पोलिसाकडून अभय ,पत्रकार परिषदेत पीडितेची न्यायाची मागणी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
इंदिरानगर येथे राहत असलेली पीडित महिला हिचा काही कारणास्तव पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यात आला होता . ती आपल्या आठ वर्षाच्या मुलीला घेऊन राहात असताना. शेजारी राहणाऱ्या विशाल पोद्दार त्याच्यासोबत ओळखी होऊन त्याचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. या प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पीडितेवर बलात्कार केला असल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला दिनांक 19 /6/ 2022 रोजी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्या संदर्भाचा गुन्हा कलम 376 अन्वे नोंद करण्यात आला आहेत. मात्र अजूनही आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली नसून त्याला पोलिसांकडून अभय दिल्या जात असल्याचा आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू , रेखा जाधव, मीनाक्षी जोता यांनी केली आहे.
मागील दोन वर्षापासून मी तुझ्याशी लग्न करतो म्हणून माझ्या सोबत नेहमी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. दरम्यान मी अनेक वेळा गर्भवती झाली असताना सुद्धा त्यांनी मला औषध देऊन माझा गर्भपातही केला. याच दरम्यान  मला नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे माझ्या मुलीला बरोबर घेऊन बुट्टीबोरी चांदगाव येथे रूम करून दोन महिने  ठेवला. त्यादरम्यान सुद्धा माझ्या सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित  करीत होता. मार्च महिन्यात विशालची परीक्षा असल्याने चंद्रपूर येथे परत आला. तेव्हापासून माझ्यासोबतचा संपर्क व संबंध सोडून  आणि आपले काही संबंध नाही मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून मला आपल्यापासून दूर  केला. माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन माझ्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या नराधमाला लवकरात  लवकर अटक करावी व मला न्याय द्यावा अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून  पीडितेसह सामाजिक कार्यकर्त्या यांनी केला आहे.