जयंत लालचे नशीब बलवंत म्हणून जीव वाचला!


जयंत लालचे नशीब बलवंत म्हणून जीव वाचला!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
शहरातील बागला चौकातून निघणारी भरधाव वेगाने चार चाकी वाहन बल्लारशहा बायपास रोड कडे जाणाऱ्या हुंडाई आय ट्वेन्टी DL2C AR3468 या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरील मद्यधुंद अवस्थेत असल्याने ताबा सुटला.
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोरील उड्डाणपुलावर जबरदस्त धडक दिल्याने गाडीच्या अक्षरक्षा चेंदामेंदा झाला आहे. मात्र वाहन चालक जयंतीलाल वय अंदाजे 35 याचे नशीब बलवान म्हणून सुखरूप बचावला.

काही दिवसापूर्वी याच पुलावर दारूच्या नशेत असलेले  बल्लारपुर येथील चार मुलांचा चार चाकी वाहनांने येथेच अपघात झाला होता. ती गाडी पुलावरून खाली पडली होती. त्यात मुलाना आपला जीव गमवावा लागला होता.

भरधाव वेगाने जाणारे वाहन या पुलावर अक्षरक्षा  अपघाताची मालिका सुरु झाली असून पुलावर वळण मार्ग जास्त असल्याने वाहनावरील वेगमर्यादा जास्त असल्याने अक्षरशा याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

पुढील तपास महाकाली पोलीस चौकीचे पोलीस करीत आहेत.