आदीवासी अल्पवयीन मुलीवर रेती माफियांचा सामुहिक बलात्कार!


आदीवासी अल्पवयीन मुलीवर रेती माफियांचा सामुहिक बलात्कार!

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस
निरीक्षक मनोज गभने यांची धडक कारवाई

दिनचर्या न्युज :-
चिमूर : - दिनांक.३०/०६/२०२२ ला चिमूर पोलीस स्टेशन येथे आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक.(१) मारुती मुर्लीधर निखाडे वय अंदाजे ३५ वर्ष, जात कुणबी, धंदा- मजुरी रा. झरी ता. चिमुर जि. चंद्रपूर (२) चिंटु पटेल रा.नेताजी वार्ड चिमूर (३) अल्पवयीन अयान रा. नेताजी वार्ड चिमुर (४) पिवळया रंगाचा शर्ट घातलेला अनोळखी ईसम (५) निळया लाल चेक्सचा शर्ट घातलेला अनोळखी ईसम रा. मौजा झरी ता. चिमुर जि.चंद्रपूर यांचेवर अप.क्र.२०५ / २०२२ कलम ३७६ (२) (J), ३७६ (२) (N), ३४१, ३६३, ३६६ (अ), ३४ भा. दं. वि. सहकलम ४, ६ लै.अ.बा.सं.अधि. सहकलम ३ (२) (v) अ.जा.ज.अ.प्र.का. सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ ते ३ यांना ताब्यात घेतले असुन अटक करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची हकीकत याप्रमाणे आहे की, यातील पिडीत हि अनुसुचित जमाती या प्रवर्गातील गोंड जातीची व अल्पवयीन असल्याचे आरोपीस माहिती असतांना सुध्दा त्याने पिडीतेशी जवळीक निर्माण केले व बोलणे चालणे सुरु करुन फेब्रुवारी / २०२२ पासुन तिला लग्नाचे आमीष दाखवुन व भिती दाखवुन वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच घटना ता. वेळी व ठिकाणी आरोपी क्र. १ याने पिडीतेस घरी जावू न देता ओढत नेवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने त्याचे मित्र आरोपी क्र. ४ व ५ यांना घटनास्थळी बोलाविले. आरोपी क्र. १ याचे सांगण्यावरून सदर आरोपी क्र. ४ व ५ यांनी पिडीतेला मोटर सायकलने चिमुर येथे आणुन आरोपी क्र. २ यांचे घरी पोहचवुन दिले त्यावेळी आरोपी क्र. २ सोबत आरोपी क्र. ३ हा हाजर होता. आरोपी क्र. २ याने पिडीतेस रात्रभर आपले घरी ठेवुन दुसऱ्या दिवशी आरोपी क्र. ४ व ५ यांनी चार चाकी वाहनाने पिडीतेस चिमुर वरुन गोंडपिपरी येथे पळवून नेऊन नंतर तिला बस स्टापवर सोडुन दिले. त्यानंतर पिडीता ही तेथे राहणारी तिची मैत्रिण हिचे घरी थांबुन राहीली. पिडीतेच्या घरच्या लोकांनी तेथे पोहचुन तिला ताब्यात घेतले व घरी परत घेऊन आले. पिडीतेने आजरोजी झालेला प्रकार घरच्यांना सांगितल्याने व तिला पो.स्टे. ला घेऊन आल्याने पिडीतेच्या तोंडी रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदर गुन्हयाचे घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमुर तसेच पोलीस निरीक्षक पो.स्टे. चिमुर यांनी भेट दिलेली असुन शांतता आहे.कोर्टाने PCR दिल्याचे कळते.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमुर करीत आहे.दिनचर्या न्युज