लोकनेते मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शुक्रवारी श्री मंगल कार्यालयात होणार भव्य नागरी सत्कार






लोकनेते मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शुक्रवारी

श्री मंगल कार्यालयात होणार भव्य नागरी सत्कार

दिनचर्या न्युज :-
भद्रावती : स्थानीक श्री मंगल कार्यालयात येत्या शुक्रवारी ५ ऑगस्टला महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते ऍड. मोरेश्वर टेमुर्डे यांचा "सहस्रचंद्रदर्शन सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ भद्रावती सह शहरातील विविध सामाजिक संस्था एकत्रित येऊन हा सोहळा आयोजित केला आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सी.एल.थूल (रिटायर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मुंबई) राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे माजी आमदार तथा शेतकरी नेते मा. पाशा पटेल उपस्थित असतील. तरी या कार्यक्रमाला भद्रावती परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते ऍड मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब सहस्रचंद्रर्शन सोहळा समितीचे चंद्रकांत गुंडावार, रवींद्र शिंदे, प्रशांत शिंदे, धनराज आस्वले, गिरीश पद्मावार, जयंत टेमुर्डे, पुरुषोत्तम मते, पांडुरंग टोंगे, माधव कौराशे, प्रशांत कारेकर, सुभान सौदागर, नागो बहादे, बाळा पडवे, सुधीर सातपुते, प्रेमदास आस्वले, सुखदेव साठे, विठ्ठल मांडवकर, लक्ष्मण बोढाले, एड. भूपेंद्र रायपुरे, ज्ञानेश्वर डुकरे, विठ्ठल बदखल, अण्णा कुटेमाटे, राजू बोरकर, सुशील देवगडे, विजय सातपुते, भाविक तेलंग, अजय रामटेके, सुषमा शिंदे, सुनिता खंडाळकर, किरण साळवी, मंदा वरखडे, विलास गुंडावार, विलास भिवगडे, डॉ. प्रेमचंद, एड. शेख, बबन शंभळकर, पंढरीनाथ गायकवाड, गुलाब पाकमोडे, डॉ. ज्योति राखुंडे, डॉ प्रकाश तितरे, डॉ.घोसरे यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज