काँग्रेसला दे धक्का ! भिसी येथील माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे व घनश्याम डुकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश



काँग्रेसला दे धक्का ! भिसी येथील माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे व घनश्याम डुकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश


कांग्रेस ला दे धक्का! भाजप ला मिळाली बळकटी.

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून केला प्रवेश.

दिनचर्या न्युज
चिमूर..  
  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चिमूर येथील शहीद दिन  सोहळा कार्यक्रम प्रसंगी आले असता आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नवीन वाड्यात भिसी येथील माजी जीप सदस्य ममता डुकरे व घनश्याम डुकरे व हर्षल डुकरे यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला.  काँग्रेसला दे धक्का!    चिमूर भिशी क्षेत्रातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून भाजप बळकटी मिळाली. 

     माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे, सहकार नेते घनश्याम डुकरे यांचे भीसी व तालुक्यात कांग्रेस च्या माध्यमातून प्रस्थ होते. माजी मंत्री, आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे   खंनदे समर्थक समजले जाणारे  डुकरे दाम्पत्य काँग्रेस सोडून  भाजपात प्रवेश केला आहे.  चिमूर क्षेत्रात वाढलेली काँग्रेसची गटबाजी ही त्याच्यातून उघड उघड झाल्याचे स्पष्ट होत आहे. आणखी काही जात काँग्रेसी भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न चिमूर क्षेत्रातील जनतेला पडला आहे? त्याचे वेडीच मंथन करण्याची जरूरत काँग्रेसला पडली आहे.
परंतु कांग्रेस च्या गटबाजी ला कंटाळून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकास कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून डुकरे दापत्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे ,   यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. 
यावेळी राज्याचे    वने व सांस्कृतीक कॅबिनेट मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार
 , कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ देवराव होळी आमदार कृष्णा गजभे,माजी आमदार मितेशजी भांगडीया, माजी आमदार सुधीर पारवे,माजी आमदार संजय धोटे, भाजप प्रदेश सदस्य वसंत  वारजुकर डॉ श्यामजी हटवादे, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री जुनेद खान जितेंद्र मोटघरे माजी नगरसेवक सतीश जाधव उपस्थित होते.