२९ ऑगस्टला चंद्रपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रांताध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार!
२९ ऑगस्टला चंद्रपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रांताध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सोमवार दि.२९ऑगस्ट २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक दु.४ ते ६ च्या दरम्यान जनता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे पॅरेंटचे सर्व विधानसभा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी,पक्षाचे विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी,जेष्ठ नेते,यांनी हजर रहायचे आहे.
त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष आद.जयंत पाटील साहेबांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला,युवक, विद्यार्थी,यांचे केवळ विधानसभा/तालुका आणि शहर अध्यक्ष यांनी या बैठकीला आवर्जून हजर रहायचे आहे,या व्यतिरिक्त पक्षाच्या सेवादल, युवती, आणि सर्व सेलचे "केवळ जिल्हाध्यक्ष" यांनी या बैठकीला आप आपला अहवालासह न-चुकता हजर रहायचे आहे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.