... या तारखे पासुन काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्ह्यातून गौरव यात्रा रॅलीचे आयोजन




... या तारखे पासुन काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्ह्यातून गौरव यात्रा रॅलीचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आतापर्यंत जवळपास सव्वा दीड महिन्यानंतरही दोन मंत्र्याच्या भरोशावर पूर्ण राज्याचा कार्यभार चालवत असल्याने शासन प्रशासनावर जनतेच्या प्रश्नासंदर्भात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थिती, शेतकऱ्याचे न भरून निघणारी परिस्थिती पहाता सरकारने लवकरात लवकर ऐक्टरी 75 हजाराच्या वर मदत जाहीर करावी. पूर परिस्थितीत पीडितांना भरपाई द्यावी.राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री नसल्याने संपूर्ण व्हीसी प्रश्न निर्माण झाला आहे. विशी आतापर्यंत व्हायला झाली पाहिजे होती. मात्र सरकार मध्ये दोनच मंत्री कार्यभार पाहत आहेत. याला सरकार चालवणे म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. स्वतंत्र देशाचे अमृत महोत्सव पदयात्रा संपूर्ण देशात माननीय खासदार कथा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशान्वये काढण्यात येत आहे.
 काय बोलायचं  लबाड केंद्राच्या आताच्या धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्यप्राप्तीच्या  लढ्यासाठी  अनेक देशभक्तांनी आपल्या  प्राणाची आहुती देशासाठी दिली. हे विसरता कामा नये. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण जिल्हा अमृत महोत्सव ,   गौरव यात्रा रॅलीच्या माध्यमातून पिंजून काढणार जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. काँग्रेस आणि काँग्रेस विचाराच्या देशभक्तांनी या देशासाठी रक्तरंजित दिले.
 आता केंद्र  सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घरावरती  झेंडा फडकवण्याचे आव्हान केले आहे. केंद्र सरकारने मूलभूत समस्या दूर ठेवून आता घर घर झेंडा लावाचा लढा लावला आहे. या सरकारने घर पहिले दिली पाहिजे,एकीकडे देशात महागाई,  अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वसाधारण माणसाला प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावून कंबरडे मोडण्याचा काम  केंद्रसरकारकडून केले जात आहे. आणि हा नवीनच फंडा केंद्र सरकार  घरघर झेंडा लावण्याचे  सांगताहेत. 
 काँग्रेस पार्टीच्या वतीने   तिरंग्याचे महत्व पटवून देण्यासाठी भारतात कन्याकुमारीपासून सोळा दिवसाचा प्रवास प्रत्येक जिल्ह्यात 75 किलोमीटर यात्रा स्वतंत्र  तिरंगा घेऊन  याची सुरुवात नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून करण्यात येत आहे. जिल्ह्यातून राजुरा तालुक्यातील करंजी या गावुन  राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात दिनांक 10 ऑगस्टला येणार आहे.  प्रत्येक गावातील जागोजागी रथयात्रेच्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे चित्र रथ दाखवले जातील. दुसरा टप्पा मूल तालुक्यातून  संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात निघेल. सिंदेवाही नवरगाव  या मार्गाने जाऊन या रथयात्रेचे नेतृत्व डाॅ.अविनाश वारजुरकर  चिमुर  यांच्या नेतृत्वात केली जाणार आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रातील चित्र रथयात्रेचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. शेगाव मार्गे निघून  वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, खासदार बाळूभाऊ धानोरकर नेतृत्वात चित्र रथ यात्रा निघणार आहे. जिल्ह्यातील 180 किलोमीटरच्या या रथयात्रेचे आणि 90 किलोमीटर  पदयात्रा राहील. या यात्रेचे रस्त्या रस्त्या स्वागत राहील  रथा वरूनच  जनतेला संबोधन करण्यात येईल. जिल्ह्याच्या 110 गावातून चित्र रथ यात्रा   माध्यमातून स्वातंत्र्याची माहिती दाखवली जाईल. 
 ही यात्रा  चंद्रपूर शहरात 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनी शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काढण्यात येऊन ती गांधी चौकात स्थापित केल्या जाईल.  या यात्रेला गौरव यात्रा रॅलीचे नाव  दिले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत राजुराचे आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी मंत्री,आ. विजय वडेट्टीवार, सी डी सी बँकेचे अध्यक्ष  संतोषसिह रावत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष रामू तिवारी, सौ.संगीता अमृतकर,  सौ.नम्रता ठेमस्कर,  यांची उपस्थिती होती.