निलजई गावात दारू माफियांचा सुळसुळाट? पोलीस बघ्याच्या भूमिकेत

निलजई गावात दारू माफियांचा सुळसुळाट? पोलीस बघ्याच्या भूमिकेत

पोलिसांच्या हप्ताखोरिने गावात बेकायदेशीर अवैद्य दारू विक्री, गावाची शांतता धोक्यात ?


दिनचर्या न्युज :-
माढेळी प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील माढेळी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी व अवैध दारूविक्री सुरू असताना पोलीस मात्र हप्तेखोरीत बघ्याच्या भूमिकेत दिसत असल्याने गावात झगडे व तंटे सुरू आहे. परिसरात अशांतता निर्माण झाली आहे.दरम्यान निलजई या गावात
अमोल , नगराले,अवि ,साईनाथ , मिलिंद या अवैद्य दारू विक्रेत्यांमुळे बैल पोळ्याच्या सणाला गालबोट लागले होते. सदर संभावित दंगे होणार असल्याने याबाबत काही नागरिकांनी पोळ्याच्या अगोदर पोलिस प्रशासनाला फ़ोन करून सुचना दिली पण अगोदरच हप्तेखोरित बुडालेल्या पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची माहिती गावकर -यांनी माध्यमांना सांगितले.

गावात शांतता सुव्यवस्थेला तडे देणारी अवैध व बेकायदेशीर दारू विक्रीने कुणाच्या आकस्मिक मृत्युचे कारणं बनू शकते. त्यामुळे ठाणेदार खोब्रागडे यांनी याबाबत त्वरीत लक्ष देऊन अवैध दारू विक्रीवर आळा घालावा .अशी मागणी गावातील नागरिकांकडून होतं आहे.