चंद्रपूर तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर पर्यंत कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यार...





चंद्रपूर तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर पर्यंत
कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यार...

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रामध्ये कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान राबविण्यात येत आहे. सदर मोहिम यशस्वीपणे राबविणे व जनजागृती करण्याकरिता तालुका स्तरावर तालुका समन्वय समितीची सभा मा. श्री. आशुतोष सपकाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती चंद्रपूर येथे पार पडली. सभेला मा. डॉ. नटवरलाल श्रृंगारे, तालुका आरोग्य अधिकारी, चंद्रपूर, श्री निवास कांबळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चंद्रपूर, श्रीमती आरती जगताप, बाल विकास प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर, श्री. डी. एम. गौरकार, वि. अ. (आरोग्य), श्री. बी. पी. मडावी, वि. अ. (शिक्षण), श्री. एम. एस. नन्नावरे, आरोग्य सहाय्यक, श्री. खिरेंद्र पाझारे, एस. टी. एस. श्री. अमोल जगताप, टी. बी. एच. व्ही. श्रीमती पाटलीण आसुटकर, पी.एम.डब्ल्यू. श्री. अक्षय प्रकल्प समन्वयक, प्रकृती संस्था व श्री रोहीदास राठोड, बीसीएम हजर होते. देशमुख,

सदर मोहिम तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ९९ गांवामध्ये १,४९,८३५ लोकसंख्येच्या ३८७५२ घरांमध्ये एकुण १४ दिवस यशस्वीपणे राबविण्याकरिता एकूण १७१ टिम, ३४ सुपरवायझर ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये टिमद्वारे गांवातील प्रत्येक घरी भेट देवून महिलांची व पुरुषांची शारीरीक तपासणी करणार आहेत. याकरिता महिलांची तपासणी आशा स्वयंसेविकाद्वारे व पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवकाद्वारे करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी तपासणी करिता आलेल्या टिमला आपली शारीरीक तपासणी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन श्री आशुतोष सपकाळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर यांनी केले आहे.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणने, नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे तसेच याच मोहिमेदरम्यान सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत असून क्षयरोगाचे निदान न झालेल्या समाजातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणने मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, संबंधीत क्षयरुग्णांचे थंकी नमुने व एक्स रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करणे हे या मोहीमेचा उद्देश आहे.