चंद्रपूर शहरातील साठ वर्षांपूर्वीची तीन मजली इमारत कोसळली! जीवितहानी...!


चंद्रपूर शहरातील साठ वर्षांपूर्वीची तीन मजली इमारत कोसळली! जीवितहानी...!

चंद्रपूर शहरात 60 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळली. यात व्यक्ती दबल्याची भीती आहे. घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालय परिसरात ही इमारत आहे. पुंडलिक पाटील आणि त्यांचे कुटुंब या इमारतीत वास्तव्याला होते. इमारत अचानक हलू लागल्याने कुटुंबातील व्यक्ती बाहेर आल्या. मात्र एक जण आतच अडकून राहिल्याने दबला गेल्याची भीती आहे. शाहीस्ता खान (42) असं मलब्यात अडकलेल्या महिलेचं नाव आहे. घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे पथक व पोलिसांनी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. जुनी व मोडकळीस आलेली ही इमारत असल्याने मनपाने रिकामी करण्याचा इशारा दिला होता. शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती आहे. याची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला पाचारण करण्यात आले असून शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान मलब्यात दबलेल्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

https://youtube.com/shorts/HHxpAPI1s20?feature=share

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
बातमी वाचण्यासाठी...
*दिनचर्या न्युज*
दिनचर्या वृत्तपत्र /वेबसाईट /ई-पेपर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा