मुल येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाचा दरवाजा बंद ! भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त!
मुल येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाचा दरवाजा बंद ! भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाला दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. कामाच्या दिवसी  कार्यालयाचा दरवाजा बंद करून कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नसल्याने नागरिकांना आल्या पावली वापस जावे लागते . 
या कार्यालयात सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा कार्यभार असल्यामुळे वारंवार या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली वापस जावे लागते. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोणतेही वेळेचे बंधन नसून मन मर्जीनुसार कार्यालयात येतात, आणि जातात .अशाप्रकारचा भोंगळ कारभार सामाजिक वनीकरण मुल कार्यालयात सुरू असून याचा वाली कोणी नसल्याचे आज प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले.