श्री माता महाकाली महोत्सव शोभायात्रेने चंद्रपूर नगरी दुमदुमली ' हर हर शंभू' फेम गायिका अभिलिप्सा पांडा ठरल्या शोभायात्रेच्या मुख्य आकर्षक केंद्र!

श्री माता महाकाली महोत्सव शोभायात्रेने चंद्रपूर नगरी दुमदुमली
' हर हर शंभू' फेम गायिका अभिलिप्सा पांडा ठरल्या शोभायात्रेच्या मुख्य आकर्षक केंद्र!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात आतापर्यंत न झालेल्या इतिहासात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन नवरात्री निमित्ताने करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि श्री महाकाली माता सेवा समितीच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एक ऑक्टोंबर पासून या महोत्सवाला सुरुवात झाली. विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन महोत्सवा निर्मित करण्यात येत आहेत. दोन ऑक्टोबरला शहरातून काढण्यात आलेल्या नगर प्रदक्षणा यात्रेने चंद्रपूरकरांचा डोळ्याचे पारणे फिटले. न भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम.  मुख्य आकर्षक हर हर शंभू फेम गायिका अभी लिप्सा पांडा यांनी चंद्रपूर करांचे लक्ष वेधले . शहरात पहिल्यांदाच पालखी शोभायात्रा काढण्यात आली. महाकाली मंदिरापासून आरंभ झालेल्या पालखीचे शहरातून भ्रमण करून महाकाली मंदिरात पालखीचा समारोप करण्यात आला. आठ किलो चांदी च्या महाकाली देवीच्या मूर्तीचे विधीवत पूजा करून नगर प्रदर्शना काढण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली देवी च्या  मूर्तीला खांद्यावर घेऊन  प्रस्तान केले. नागपूर येथील शिवगर्जना ढोल पथक, गायत्री परिवारांच्या 100 महिलांचा कळस समूह, लेझीम पथक, कराटे प्रात्यक्षिक, सजविलेल्या विविध वाहनावर देवतांचे देखावे.  ध्वजधारी पथक, आदिवासी नृत्य, विविध शहरातून गावातून आलेल्या पथक, भजन मंडळ, महिलांचे डोक्यावर घेतलेले वृंदावन कळस, विविध बँड  पथके, शालेय विद्यार्थ्यांची लेझीम पथक, अशा विविध पथकांनी सजलेले देखावे अशा अद्भुत पूर्व डोळ्याचे पारणे फेडणारे देखाव्यांनी महाकाली देवी नगरप्रदक्षिणा शोभायात्रेने  अवघे चंद्रपूर शहर रविवारी दुमदुमले, या शोभायात्रेच्या दरम्यान हर हर शंभू फेम गायिकाअभिलीप्सा  पांडा हा चंद्रपूर करांच्या आकर्षक राहिल्या. शोभायात्रेतील विशेष आकर्षण शोभायात्रेच्या स्वागतासाठी चंद्रपूरकरानिही  लाखोच्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि, नाश्ता आणि मिठाई  स्टॉल्स  लावण्यात आले होते. या श्री महाकाली मातेच्या महोत्सवाने  सध्या शहरात  मंगलमय वातावरण असून कार्यक्रमाची चांगली प्रशंसा केली जात आहे.