स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुरातील उच्चभ्रू भागात देहविक्री सुरू असलेल्या अड्ड्यावर मारली धाड!

स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुरातील उच्चभ्रू भागात
देहविक्री सुरू असलेल्या अड्ड्यावर मारली धाड!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चंद्रपुरातील एका उच्चभ्रू भागात देह विक्री सुरू असलेल्या ठिकाणी धाड मारली.शहरात आता देहविक्री चा व्यवसाय छुप्या मार्गाने सुरू आहे, असेच एक प्रकरण चंद्रपूर शहरात उघडकीस आले. ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत एका मुलीची सुटका केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत असून हत्या, अवैध धंदे, चोरी यामध्ये जिल्हा अव्वल होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
नागपुर येथील सामाजिक संस्थेद्वारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चंद्रपुरातील एका उच्चभ्रू भागात अल्पवयीन मुलींना देहव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची गुप्त माहिती दिली.
बाळासाहेब खाडे यांनी माहितीच्या आधारे त्या भागात जाऊन चौकशी केली असता सदर मुलगी ही अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले, मात्र त्या मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निष्पन्न झाले असता गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत देहविक्री व्यवसायातून त्या मुलीची सुटका केली.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.