जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन, वित्त विभागात बदल्यांचा घोळ कायमच! मलाईदार टेबल सोडण्यास कर्मचाऱ्यांचा नकार!






जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन, वित्त विभागात बदल्यांचा घोळ कायमच! मलाईदार टेबल सोडण्यास कर्मचाऱ्यांचा नकार!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षापासून बदल्यांचा घोळ कायम असून वित्त विभागापासून तर आता सामान्य विभागापर्यंत ही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मलाईदार टेबलवर बसलेले 'वारस हक्कदार' समजणारे कर्मचारी ,अधिकारी वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत असल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे कारवाई होणे , बदल्या होणे अनिवार्य असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची ना बदली होत , ना विभागातील कार्यालयातला टेबल बदलल्या जात.आणि बदली झालीस तर पुन्हा हेच कर्मचारी परत पावलांनी त्याच टेबलवर आपले बस्तान मांडतात. जसे की ,यांना जिल्हा परिषदने 'घर जावई' म्हणून ठेवले आहे. अशाप्रकारे वापस येतात!
जिल्ह्याची मिनी मंत्रालय अनेक कारणास्तव चर्चेत असतेच असते.
सध्या जिल्हा परिषद मध्ये  प्रशासनाचे राज्य सुरू असून मिनी मंत्रालयात सध्या कुठल्याही पक्षाची सत्ता नसल्याने प्रशासनाचे देखरेखी खाली सगळे सर्व काम सुरू आहे. अशातच नवीन सिओ जिल्हा परिषदला लाभलेले आहेत. आता यांच्याकडे सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे जिल्हा परिषदमधील अनेक विभागात कित्येक वर्षापासून एकाच विभागात एकाच टेबलवर कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी ठान मांडून म्हणून बसले आहेत. खास करून वित्त विभाग , सामान्य विभागातील मोठा भोंगळ कारभार जिल्हा परिषद मध्ये उघडकीस येत आहे.
वित्त विभागातील श्री मेलवींन रायपूरे जेष्ट सहायक लेखा यांची 2 वर्षापूर्वी पंचायत समिती जिवती येथे बदली झालेली होती .परंतु तिथे न जाता विभागीय आयुक्त नागपूर येथून  अधिकाऱ्यांसोबत गोलमाल करून पुन्हा
   परत प्रतिनियुक्तीवर त्याच टेबलवर वित्त विभाग येथे अंकेक्षक शिक्षण व महिला बालकल्याण मलाई च्या टेबल वर ठाण मांडून बसले आहे .
श्री सुरेंद्र चापडे कनिष्ठ सहायक लेखा यांची  सुद्धा सन 2021-22 मध्ये प्रशासकीय पंचायत समिती मुल येथे बदली झाली आहे. परंतु याना येतून सोडण्यात आलेले नाहीत. यांना सुद्धा प्रशासकीय बदली चा विसर पडला आहे .हे सुद्धा मोह- मायाच्या लालचीसाठी आपला टेबल सोडण्यास तयार नाहीत.हे ठेवी व अग्रीम हा टेबल सांभाळत आहे.  
श्रीमती रीमा सोरते कनिष्ठ सहायक लेखा हे सुद्धा गेल्या 15 वर्ष पासून भविष्य निर्वाह निधी एकाच टेबलवर पदोन्नती घेऊन सुद्धा त्याच टेबलवर कार्यरत आहे. त्यांचा विभाग सुद्धा बद्दलविण्यात येत नाही.   शासनाच्या  निर्णयाला केराची टोपली दाखवणे. हा सर्रास खेळ जिल्हा परिषद मध्ये प्रकार सुरू आहे.
जिल्हा परिषद मधील पुन्हा एक महत्त्वाचा  समजला जाणारा विभाग म्हणजे सामान्य प्रशासन विभाग  या विभागात सुद्धा  शासनाच्या नियमाला धाब्यावर  ठेवून येथील कर्मचारी ,अधिकारी आपले टेबल सोडण्यास हीचकीचतात याचे कारण, म्हणजे  याच्याकडे पूर्वीपासून असलेले धागेदोरे या टेबलवर गवसल्याचे बोलले जात आहे. म्हणून टेबल सोडण्यास कुणीही तयार होत  नसल्याची चर्चा  जिल्हा परिषद मध्ये होत आहे.
श्री धीरज पोटवर कनिष्ठ सहायक यांची सुद्धा 2 वर्षे पूर्वी बदली पंचायत समिती मुल येथे झाली आहे परंतु Tयाना 30 सप्टेंबर 2022 ला रिलिव्ह करण्यात आले. तरीपण त्याच टेबल वर काम करताना दिसून येते आहे. 
श्री सचिन किनाके वरिष्ठ लिपिक यांची सुद्धा पंचायत समिती सावली येथे बदली झाली आहे. सप्टेंबर 2022 ला रेलिव्ह करण्यात आले तरीपण त्याच टेबल  आपले बस्तान मांडून बसले आहे.
शीतल  बोरगमवार वरिष्ठ लिपिक यांची सुद्धा पंचायत समिती   पोभुर्णा  येथे बदली झाली आहे. तरी सुद्धा त्यांना येथून सोडण्यात आले नाही.
शासनाच्या नियमाला  धरून शासन  निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांची बदली होत असतात. परंतु जि.परिषद मध्ये रुजू झाले तेव्हा पासून एकाच विभागात एकाच टेबलवर  कार्यरत आहेत.वर्षानुवर्ष का बरं यांची बदली होत नसेल? हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे? चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यपालन अधिकारी(सीओ) या विभागाकडे जातीने लक्ष देतील का? वर्षानुवर्षे एकाच टेबलवर असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या बदल्या करतील का?  सदर शासनाच्या नियमानुसार दर चार वर्षांनी प्रत्येक विभागातील टेबल बदली बाबत  शासन निर्णय असतात. मात्र सर्व  शासन निर्णयाची  पायमल्ली होत असून. जिल्हा परिषदच्या  मुख्य वित्त विभागासह आता सामान्य विभागातील  भोंगळ कारभार लवकरात लवकर थांबणार का? असा प्रश्न  भेडसावत आहे.   जिल्हा परिषद मध्ये आता नवनियुक्त  रुजू झालेले मुख्य कार्यपालन अधिकारी याकडे  गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा परिषद मध्ये होत असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी. अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. 
( पुढील अंकात पहा ...या विभागातील पोलखोल!)