माझ्या मुलाला जीवेमारून झाडाला लटकविले! https://police

माझ्या मुलाला जीवेमारून झाडाला लटकविले! https://police.

जिवती तालुक्यातील केकेझरी गावातील घटना

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
माझ्या मुलावर आरोप केले की, माझ्या मुलीला तुझा मुलगा अश्लील शब्दात बोलला आहे. असे म्हणून रामचंद्र कुठे आहे.त्याला आम्ही जीवानिशी मारणार आहे. अशी धमकी देऊन गेले.
गावातील दिनेश भोगे, वसंत भोगे, रवी भोगे, शांतकुमार गोरे, बाळू गायमुखे, परमेश्वर भोगे यांनी माझ्या मुलाची हत्या mardar.html करून त्याला शेतातील धुऱ्यावरील झाडाला गळफास लावून लटकवण्यात आले.ही घडना दिनांक 7/ 10 /2022 ला मध्यरात्री उघडकीस आली.
मृत्तक रामचंद्र व्यंकटी गोतावळे वय 20 वर्षीय 
घाबरलेल्या अवस्थेत शेताकडे पळत गेला. त्याचा पाठलाग करू या पाच जणांनी त्याची हत्या केली. असा आरोप पत्रकार परिषदेत रसिका गोतावळे, शिवमूर्ती गायकवाड, सुरज गोतावळे, जानकाबाई गायकांबळे, यांनी केला आहे.
      बोलताना म्हणाले की, आम्ही या संदर्भाची तक्रार  जिवती पोलीस स्टेशनला सतत दोन दिवस चकरा मारल्यानंतरही पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही.   तपास तर  सोडा, उलट आम्हाला धमक्या देऊन आल्या तसे वापस जा ,अशा   उद्धट भाषेत  गैरव्यवहार करत होते. म्हणून आम्ही आज  चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे या संदर्भाची तक्रार दाखल केली असून योग्य ती चौकशी करून मला न्याय देण्यात यावा. संबंधित हत्यारांवर कळक कारवाई करावी. आम्हाला येथे आठ दिवसात न्याय न मिळाल्यास पोलीस स्टेशन समोर आम्ही  सामूहिक आत्मदहन करू ,असा आज पत्रकार  परिषदेतून इशारा दिला आहे.