अल्पभूधारक शेतकरी मारतो वीज मीटर साठी महावितरणच्या खेटा! mhavitaran




अल्पभूधारक शेतकरी मारतो वीज मीटर साठी महावितरणच्या खेटा! mhavitaran chandrapur

शेजारच्या शेतात महावितरणचे विद्युत कनेक्शन, धनंजय तीन वर्षापासून मारतो वीज वितरणच्या कार्यालय चक्रा!
7 वर्ष होऊनही अवैध विज जोडणी विरुद्ध कारवाई का नाही?


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य,विद्युत कंपनी मर्यादित महावितरण कंपनीने, महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमात राहून राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सुलभ पीक उत्पादन घेण्यासाठी विद्युत पंप शेतकऱ्यांना जोडणी देत आहे. मात्र वढोली येथील अल्पभूधारक शेतकरी वीज मीटरच्या जोडणीसाठी महावितरणच्या चकरा मारत आहे. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्याला कुठलेही घाम येत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, विद्युत  कनेक्शन देणे हे अवैद्य आहे.  मग अवैद्य आहे तर, बाजूच्या शेतामध्ये कुठल्या नियमाने, विज कनेक्शन पुरवठा करण्यात आला आहे. 
 हा ही मात्र वीज वितरण कंपनी विषय प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे वीज वितरण कंपनी मोठे मोठे दावे करत आहे. की सर्वांना वीज मिळाली पाहिजे. कुणीही अंधारात राहता कामा नये, कुणीही शेतकरी शेतीवरील विद्युत पंपां शिवाय राहता कामा नये. असे म्हणत असताना मात्र धनंजय सारखा शेतकरी आज महावितरणच्या कार्यालयात आटापिटा करत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण पाठ्यक्रमात शिकत आलो. जगाचा पोशिंदा म्हणूनही आपण शेतकऱ्यांना संबोधित करतो, जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला जो मान आणि साधन सुविधा मिळायला हव्या त्या मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मिळताना दिसत नाही. सरकार दिखाव्यासाठी योजना जाहिर करतात मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याचे असंख्य उदाहरण आपल्यासमोर आहे. देशात महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिध्द ठरला आहे ह्याला कारण प्रशासनाची शेतकऱ्यांबद्दल असलेली अनास्था कारणीभूत असल्याचे प्रत्यय वारंवार येते.

सध्या शेतीचा हंगाम सुरू असून पिकांना पाण्याची गरज आहे. पीक हाती यावी ह्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करत असतो. मात्र सिंचनासाठी पाण्यासोबत विजेचीही आवश्यकता असते. शेतकरी विजेची जोडणी मिळविण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना विज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे घालावे लागतात हाच अनुभव मागील तीन वर्षांपासून अल्पभूधारक शेतकरी धनंजय साखरकर ह्यांना येत आहे.

प्राप्त माहितीनुसार धनंजय प साखरकर ह्याचे मौजा वढोली ता.जि. चंद्रपूर येथे शेती असुन त्यांनी तीन वर्षांपूर्वी वीज जोडणीसाठी विज वितरण कंपनीला अर्ज दिला असुन दरवर्षी हंगामात शेतीचे काम सोडून ते वीज वितरण कंपनीच्या विविध कार्यालयात खेटा घालत आहेत. मात्र त्यांच्या शेतापसून वितरण कंपनीचे खांब व रोहित्र 1 किमी अंतरावर असल्यामुळे त्यांना विज जोडणी देण्यास अधिकारी नकार देत असुन त्यांच्याच शेजारील स.न. 17 ह्या शेतात मागील 7 वर्षांपासून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे.

शेजारील शेतात विज जोडणी दिली जाते मात्र आपल्याला का नाही? असा प्रश्न केला असता त्या शेतातील जोडणी अवैध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे असल्याचे धनंजय साखरकर ह्यांचे म्हणणे असुन त्या संदर्भात त्यांनी अधिक्षक अभियंत्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी स्वतःच ती जोडणी अवैध असल्याचे सांगतात त्याअर्थी ती जोडणी खंडित करणे त्यांचे कर्तव्य असूनही मागील 7 वर्षांपासून अधिकारी कुठलीही कारवाई करत नसल्याने खुद्द महावितरणचे अधिकारीच अवैध विज जोडणीला संरक्षण देत असुन ह्यामध्ये काहीतरी काळेबेरे अथवा अर्थपुर्ण संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आपल्या शेतातील पीक उध्वस्त होऊ नये याकरिता ज्याप्रमाणे शेजारील शेतकऱ्याला विज जोडणी दिली त्याप्रमाणे आपल्यालाही विज जोडणी देण्यात यावी अन्यथा आपल्याला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अधीक्षक अभियंत्यांना अल्पभूधारक शेतकरी धनंजय साखरकर ह्यांनी अर्जाद्वारे केली आहे.