विक्रम गोखले vikram ghokhale यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेश रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास! dinanat hospital
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी मधील अधिराज्य गाजवणारे मागील पाच दशकापासून अधिक काळ रंगभूमीत आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले vikram ghokhale यांनी वयाच्या 77 यावर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेश रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यावर मागील काही दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. दमदार अभिनय, सार्वजनिक कार्यक्रम, रंगभूमीतील सडेतोड भूमिका यामुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपट सृष्टी, आणि त्यांच्या चाहते वर्गात शोक कडा पसरली आहे.
विक्रम गोखले छोट्या पडद्यापासून तर मोठ्या पडद्यापर्यंत गाजवलेल्या.....!
विक्रम गोखलेंच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. 'या सुखानों या', 'एबी आणि सीडी', 'नटसम्राट', 'थोडं तुझं थोडं माझं', 'कळत नकळत' 'दुसरी गोष्ट', 'अनुमती', 'मी शिवाजी पार्क', 'आघात' अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखलेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. तसेच 'स्वर्ग नरक', 'इंसाफ', 'अग्निपथ', 'खुदा गवाह', 'अर्धम' अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी काम केलं आहे. रंगभूमी, छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे विक्रम गोखले वेब-सीरिजपासूनदेखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनी 'उडान', 'क्षितिज ये संजीवनी', 'जीवन साथी', 'सिंहासन', 'मेरा नाम करेगी रोशन' या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. सध्या विक्रम गोखलेंचा 'गोदावरी' सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.
अशा महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली!