अश्लील व्हिडिओ बनवून ५० लाखांची खंडणी मागणाऱी टोळी जेरबंद chandrapur
अश्लील व्हिडिओ बनवून ५० लाखांची खंडणी मागणाऱी टोळी जेरबंद

हनीट्रॅप hanitrap मध्ये अडकला उच्चपदस्थ अधिकारी!

दिनचर्या न्यूज:-

चंद्रपूर दि. 1/12/2022
एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला  हनी ट्रॅप मध्ये  अडकवून त्याचे एका महिलेसोबत बेडरूम मधील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या  टोळीचा  पडदापास केला.
व्हि.डी.ओ. चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, तो  अधिकारी नेमका  कोण! अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. 
चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून ति चित्रफीत सामाजीक माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत आहे. त्यावर तक्रारदारयाने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगीतल्याने अनोळखी इसम हा तक्रारदार यांचे कार्यालयात जावून तक्रारदार चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ यांचेकडून ५,००,००० रू. चा चेक व   यांचेकडे नगदी रक्कमेची मागणी केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. 
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा अनोळखी इसमास पाठवून त्याचे मार्फतीने रचून दि. २९ नोव्हेंबरला खंडणी मागणारा इसम तक्रारदार यांना आणखी ५०,००,०००रू. चे सादीक खॉन रसिक खान पठाण यास तक्रारदार खंडणीची मागणी केली. त्या अनोळखी इसमाने यांचेकडून ३०,०००० रू. रोख व त्याचे मोबाईलवरून तक्रारदार यांना सदर ५,००,००० रू. चा चेक घेत असतांना रंगेहात पकडले व त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, सादीक खान याच्या मैत्रीणीने तिचे मोबाईल वरून पाठविले व तिने त्यास संबंधीत उच्च पदस्थ अधिका-यास पाठवुन व भेटुन प्रसारीत करण्याची धमकी देवुन पैशाची मागणी करण्यास सांगीतले त्यानुसार त्याने सदर कामाकरीता त्याचे नावावर नविन सिम कार्ड घेतले व त्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदाराचे मोबाईलवर व्हॉट्सअॅप द्वारे चित्रफितीचे स्किन शॉट पाठविले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवून प्रकरण संपवायचे असल्यास भेटण्यास प्रवृत्त केले व भेटीमध्ये ५० लाख रू. खंडणीची मागणी केली. तक्रारदाराने ऐवढे पैसे नसल्याचे सांगीतले तेव्हा त्याने पाच लाख रू. चे चेक व असतील तेवढी रोख रक्कम देण्यास सांगीतले. तसेच अधिक चौकशी मध्ये सदरची चित्रफित ही आरोपी झिबल मारोतराव भारसाखरे याने त्याची दुसरी पत्नी (आरोपी) हिचे राहते घरी छुपा कॅमेरा लावुन चित्रफित मध्ये असलेल्या आरोपीत महीलेच्या संगणमताने तक्रारदार यांना घरी बोलावुन बेडरूम मध्ये चित्रीकरण केले होते. त्यावरून आरोपी सादीक खॉन, झिबल भारसाखरे व त्यांच्या इतर तिन महिला आरोपीत साथीदारांविरूद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ३८४, ३८५, ३४ भा. द.वी. प्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो.उप.नि. अतुल कावळे, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, प्रकाश बलको प्रमोद डंबारे, संतोश येलपुलवार, कुंदन बावरी, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले, अजय बागेसर, भास्कर चिचवलकर, महिला अंमलदार अपणी मानकर, निराशा तितरे, सोनाली पेन्दाम यांनी केली.