... या विभागाने बांधली डोळ्यावर पट्टी, पालकमंत्री,जिल्हाधिकारी गांभीर्याने घेतील का?
राज्य उत्पादन शुल्क विभागच्या 'कृपादृष्टीने'
खुलेआम 'गुड मॉर्निंग' ला दारूविक्री!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- १३ /२/२०२३
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी नंतर तब्बल सहा वर्षांनी जिल्ह्यात पुन्हा मद्य विक्रीला सुरुवात झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मक्तेदारी सुरू झाली, नियम धाब्यावर बसून मागेल त्याला बार आणि बियर शॉपी वाटप केल्या.
मद्यपी शौकीनासाठी जणू एक पर्वरी घेऊन आली. जिल्ह्यात सगळीकडे परवाधारकांचे परवाने सुरू झाले. परवानधारक शासनाच्या नियमाला ठेंगा दाखवत. नियम धाब्यावर ठेवून राम प्रहरीच ' गुड मॉर्निंग'ला चंद्रपुरातील बार मालकाने दारू विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. कित्येक बारवाल्यानी सकाळी पहाटे पाच वाजता पासूनच मागील दारातून तळी रामाची तहान भागवत आहेत. तर काही बार मध्ये रात्री बारा -एक वाजेपर्यंत दारू विक्री होत असते. या सर्व बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहमाया , कृपादृष्टी आहे का?
मद्य पिणाऱ्यांना सकाळीच एकच प्याला प्यायला मिळत असल्याने तळी रामाची तहान भागत आहे.
मात्र यामुळे नवयुवक व्यसनाधीन होत चालले आहेत.या मद्यपीचा परिणाम होत असून येणारी पिढी भविष्यात बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला ,पुरुषांना दारू विक्रीमुळे मोठा रोष, त्रास सहन करावा लागत आहे.
हा सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून धूर्त राष्ट्राची भूमिका निभवत आहेत. म्हणून यांच्या कार्य प्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असून सर्व आर्थिक दिवाळखोरीतून होत असल्याची काही मद्यपी शौकीना कडूनच चर्चा आहे. सूत्राच्या माहितीनुसार यांना एक तारखेच्या अगोदर आर्थिक दिवाळखोरी झाली नाही तर, त्या परमिट रूमला कारवाईची भूमिका घेतात. या सर्व परवाधारकांना शासन नियमाने निर्धारित वेळ दिली असताना सुद्धा त्या वेळेला वाकुल्या दाखवून सर्रास सकाळी तळी रामाची तहान भागवत आहेत. शहरातील
बिअर शॉपी परवाधारकांना बियर विक्री करायची असताना. मात्र अनेक बियर शापीवाल्यांनी आपल्या दुकानाच्या बाजूला तळी रामासाठी पिण्याची व्यवस्था करून सर्रास नियमाचे उल्लंघन करीत आहेत.
काही परवाधारक सकाळी साफसफाईच्या बहाण्याने , तर काही मागच्या दाराने सर्रास दारू विक्री करत आहेत. संबंधित विभाग कानाडोळा करीत असल्याने परवानाधारकांचे चांगले फावत आहे. याकडे मात्र अजूनही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करण्यासाठी दिलेले शब्द पाडले होते. ते पूर्णत्वास नेले. ते अभिमानास्पद आहेत. मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यात सर्वीकडे दारूबंदी उठल्यानंतर सर्रास दारू विक्री सुरू आहे. मात्र दारू विक्रेते सर्व नियम धाब्यावर बसवून बार मधून सकाळच्या राम प्रहाला मद्य विकल्या जाते.उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून धूर्त राष्ट्राची भूमिका घेतली आहे. म्हणून आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून या संवेदनशील बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी जनतेची मागणी होत आहे.