प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना





प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- ८/२ /२०२३
चंद्रपूर येथील चिद्धलवार हॉस्पिटल डॉ. ज्योती चिद्दलवार यांच्या दवाखान्यात आज सकाळी साडेनऊ वाजता प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मूर्तक सौ. मोनिका राजेश आयतवार वय 32 वर्षे भद्रावती ह्या काल सायंकाळी प्रस्तुतीसाठी चिद्दलवार हॉस्पिटल येथे भरती झाल्या होत्या. त्यांना सकाळी साडेआठ वाजता प्रस्तुती होण्यासाठी डॉक्टरांनी कळा येण्याचे इंजेक्शन
दिल्या गेले. मात्र काही कळण्याच्या आत काही क्षणाचा विलंब न होता पेशंट दगावल्याने पेशंटच्या नातेवाईकात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मोनिकाच्या सर्व तपासण्या याच हॉस्पिटलमध्ये सुरू होत्या, पूर्ण नऊ महिने झाले असून बाळही सुखरूप होते. मोनिका स्वतः पायी चालत डिलिव्हरी रूम (प्रसुती गृहा) मध्येही गेल्या. तो तोपर्यंत परिस्थिती चांगली होती. मात्र अचानक डॉक्टरांनी मोनिकाचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईकांना दिली. आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने कुटुंबाने टाहो फोडला. दवाखान्यात काही वेळासाठी तणावाचे वातावरण झाले . मोनिकाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर आरोप केले असून त्यांच्याच अलगर्जीपणामुळे पेशंट दगावल्याची तक्रार रामनगर पोलिसात केली आहे. डॉक्टरांनी रुग्णांचे पहिले आणि दुसरे पेपर्स बदलवल्याचा आरोपही नातेवाईक निखील तणीवार व राजेश आयतवार यांनी केला आहे.
दवाखान्यात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी पाचारण्यात करण्यात आले. मोनिकाचा मृत्युदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम साठी देण्यात आला. पुढील रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कशाने झाला. स्पष्ट होणार आहे. मात्र एका गर्भवती महिलेचा मृत्यू अचानक होणे संभ्रम निर्माण करणारा आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

या संदर्भातील घटनेबाबत डॉक्टर ज्योती चीद्दलवार मनाला की,  पेशंटची तपासणी माझ्याकडेच होती .  या अगोदरही त्यांचे नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचे सांगितले. कळा येत नसल्यामुळे त्यांना इंजेक्शन देऊन कळा येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्ण डिलिव्हरी रूम पर्यंत  चांगल्या परिस्थितीत होती. मात्र अचानकच  क्षणार्धात  काही  कळण्याच्या आताच  रुग्णांनी झटके दिले. आणि रुग्ण दगावला अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली.