आंतरराष्ट्रीय कुस्ती पट्टू भाग्यश्री फंड ठरली श्री माता महाकाली राज्यस्तरी कुस्तीची मानकरी





आंतरराष्ट्रीय कुस्ती पट्टू भाग्यश्री फंड ठरली श्री माता महाकाली राज्यस्तरी कुस्तीची मानकरी

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर - : चंद्रपूरचे आमदार माननीय किशोर भाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या प्रमाणात उतरले होते. खास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू असलेली आणि आता भारताच्या ऑलिम्पिक साठी सुवर्णपदक आणण्याचे मानस असणारी अहमदनगर जिल्ह्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड ही श्री माता महाकाली राज्यस्तरीय कुस्ती चषकची मानकरी ठरली आहे.
तीन दिवस चंद्रपूर गांधी चौकात महानगरपालिकेच्या भव्य अशा प्रांगणात रंगलेल्या कुस्तीच्या थरारक सामन्यांना काल पार पडलेल्या अंतिम सामन्याने समारोप करण्यात आला. यात युवती खुल्या गटात अहमदनगरची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड ही श्री माता महाकाली राज्यस्तरीय कुस्ती चषक ची मानकरी ठरली आहे. तर पुरूष खुल्या गटात बीड जिल्ह्यातील गोकुळ आवारी हे चषकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत चंद्रपूरातील कुस्ती पट्टनीही घवघवीत यश मिळविले असुन विविध सहा गटात प्रथक क्रमांक पटकविला आहे. सदर क्रीडा महोत्सवातील स्केटींग, हॅन्ड बॉल बॅटमिंटन स्पर्धेचाही बक्षिस वितरण सोहळा पार पडला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव क्रीडा प्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरत आहे.

यात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्य भरातील नामांकित कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळ्याने समारोप करण्यात आला आहे. यात अहमदनगर येथील आंतराष्ट्रीय महिला कुस्ती पट्टू भाग्यश्री फंड ही खुल्या गटात प्रथम आली आहे. तर पुरुष खुल्या गटात बीड जिल्ह्यातील गोकुळ आवारी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते रोख रक्कम, शिल्ड आणि मानाचा गदा देण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता,धरमशिल (बाळू) कातकर, श्याम धोपटे, कुनाल चहारे, वासू देशमुख, श्याम राजूरकर,धनंजय येरेवार, अब्दुल काजी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.