दिव्यांगानी दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यांचे आवहान.






दिव्यांगानी दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यांचे आवहान-धनंजय साळवे बिडीओ

दिनचर्या न्युज
गडचारोली,
जिल्हा परिषद,गडचिरोली द्वारा मा.कुमार आशिर्वाद सर,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मिशन मोड वरील सामाजिक दायित्व ठेवीत महत्वाकांक्षी एक हात मदतीचा दिव्यांग शिबीराचे आयोजन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात करण्यांत आलेले आहे.याकरीता मिञा फांऊडेशन,नागपूर तथा मा.भुयार सर,अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे यासाठी खूप मोठे योगदान तथा अथक परिश्रम घेत आहे.समाजात जन्मतः किंवा जन्मानंतर दिव्यांगत्व आलेले घटक खूप आहेत.यांना केंद्र तथा राज्य शासनाने लागू केलेल्या सोयी-सुविधा देतांना प्रमाणपञा अभावी लाभ देता नाही.तो मार्ग अगदी सुकर व्हावा म्हणून जिल्ह्याभर शिबीराचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
गडचिरोली तालुक्यात एकूण.597 (पाचशे सत्यानऊ) दिव्यांगानी आँनलाईन नोंदणी केली असून त्यांना तपासणी करुन प्रमाणपञ देता यावे म्हणून दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केलेले आहे.ज्या दिव्यांगांची नोंदणी झाली आहे.त्यांना शिबिराचे ठिकाणी ने-आण करण्यांची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सूपूर्द केली आहे.दिव्यांगानी ग्रामपंचायतीकडे संपर्क करावा.
गडचिरोली तालुका शिबिर 13 व 14 मार्च ला सामान्य रुग्नालय,गडचिरोली येथे आयोजित आहे.करीता नोंदणीकृत दिव्यांगानी लाभ घेण्यांचे आवहान गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.
*******************************