गोंडपिपरी येथील मुलींच्या वस्तीगृहात दारुड्या अखिलचा अश्लील प्रकार, कारवाई मात्र अदखलपात्र!

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ करणारी घटना,

गोंडपिपरी येथील मुलींच्या वस्तीगृहात दारुड्या अखिलचा अश्लील प्रकार, कारवाई मात्र अदखलपात्र!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गोंडपिपरी कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात अखिल ताडशेट्टीवार हा 19 तारखेला येथील वस्तीगृहात दारूच्या नसेत रात्रीच्या वेळेस अंदाजे आठ वाजताच्या सुमारास मुलींच्या वस्तीगृहात शिरूर घाणेरडा, अश्लील शब्दात मुलींना धमकावुन बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे येथील वस्तीगृहातील मुली अक्षरशः घाबरून आहेत. शैक्षणिक क्षेत्राच्या वर्तुळात अत्यंत निर्दयी व घृणास्पद घटना आहे.
येथील अधिक्षिका लता थिपे (खामनकर) तथा सुरक्षषा समिती सदस्य यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी नुसार गैर अर्जदार अखिल ताकसेट्टीवार याच्यावर अदाखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला जमानीतीवर सोडण्यात आले. हा प्रकार अत्यंत निर्दयी आणि घृनास्पद असताना कुठलेही शहानिशा न करता पोलिस विभागानेही गंभीर प्रकरणाची दखल न घेता. पोलीस स्टेशन मधूनच जमानती होतील असे गुन्हे दाखल केले. अधीक्षिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलींना जातिवाचक,अश्लील शिवीगाळ करून मला व मुलींना जिवे मारण्याची धमकीही दिल्याची त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अखिल हा तिन वस्तीगृहाचा संचालक,अधिक्षक आहे.याच्या वस्तीगृहातील मुलींचीही विचारपुस केली तर अनेक गैरप्रकार समोर येथिल अशी तक्रार करत्यानी सांगितले.
यापूर्वीही सुद्धा याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले असल्याचीही चर्चा आहे.
याच वस्तीगृहात असलेला चौकीदार संदीप कुळमेथे, यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याने हा दारुड्या वस्तीगृहाच्या आत घुसला. चौकीदाराच्या गैरवर्तनामुळेही येथील मुली भयभीत असून सुरक्षित नाहीत. हा नेहमी आपला स्वताच्या बाजूला असलेल्या पानठेल्यावर धंदा करीत असतो. नाम मात्र चौकीदाराची जबाबदारी असल्याचे दाखवतो. यालाही इथून काढण्याची मागणी वस्तीगृहातील मुलींनी केली आहे. येथील स्वयंपाक करणारी महिलाही अनेकदा गैरहजर असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
      कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचे संचालिका  सौ . प्रभाताई  चिलके मॅडम  यांना झालेल्या प्रकरणाबाबत  विचारणा केली असता. झालेला प्रकार हा निर्दयी असून याकडे आपण गंभीरतेने   घेत असून याची तक्रार आपणही दाखल  करणार   असल्याचे प्रतिनिधींना सांगितले. त्या म्हणाल्या की येथील  अधीक्षिका यांच्यासोबत तो आत मध्ये आला. हिनेच आतमध्ये आणल्याचा आरोप केला आहे. 
परंतु सी सी कॅमेरा कुठेही अधीक्षिका सोबत संबंधित व्यक्ती आल्याचे दिसून येत नसल्याने. याही प्रकरणावर संचालिका प्रकरण दळपण्याचे व हेतू पुरस्कार अधिक्षिका वर प्रकरण लादण्याचे  प्रत्यक्ष दर्शनी दिसून येथे.
           वस्तीगृहातील अधिक्षिका  लता थिपे (खामकर) यांना झालेल्या प्रकरणासंदर्भात  त्या म्हणाला की, अखिल ताकसेट्टीवार हा रात्री दारू पिऊन, वस्तीगृहाच्या आत मध्ये शिरला, मी माझ्या रूम मध्ये लिखाणाचे काम करीत असताना माझ्याकडे मुली चीलावत ,ओरडत आल्या,आत   वस्तीगृहात कोणीतरी दारू पिऊन  आलेला आहे. शिव्या गाळी करीत आहेत. मी लगेच त्या ठिकाणी गेली आणि त्याला इथून जाण्यास सांगितले परंतु तो घाणेरडा शब्दात शिवा देत असल्याचे मी आणि मुलीही भयभीत झाले.  या संदर्भाची तक्रार आम्ही गोंडपिपरी पोलीस स्टेशनला दिली असता. चालढकल तक्रार केल्याची   आप बीती  वस्तीगृहातील अधीक्षिका व येथील राहणाऱ्या विद्यार्थिनींनी माध्यमांना सांगितले आहे.   यामुळे आम्हाला या वस्तीगृहात भीतीचे वातावरण तयार झाले असून, आमच्या जीवालाही  धोका निर्माण होऊ शकतो .अशा प्रकारची त्यांनी भिती व घाबरून आपबिती सांगितले. 
. संबंधित व्यक्तीवर जातिवादक शिव्या दिल्या संदर्भात, आणि   पाँस्को  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातही माननीय पोलीस अधीक्षक यांना या संदर्भाची तक्रार  करणार असल्याचे सांगितले.