जिल्हा परिषदच्या विविध उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद, शालेय बचत बँक, शालेय मंत्रिमंडळ, 'जागृत पालक सुदृढ बालक'
जिल्हा परिषदच्या विविध उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद,

शालेय बचत बँक,
शालेय मंत्रिमंडळ, 'जागृत पालक सुदृढ बालक'

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषदचे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाला जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद ने शालेय बचत बँक म्हणून एक उपक्रम राबविला असून प्रत्येक विद्यार्थ्याला साक्षर व्हावा, त्याला बचतीची सवय लागावी. बँकेचे सर्व व्यवहार समजावे त्याबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद शालेय बचत बँक उपक्रम 996 शाळांमध्ये सुरू केला आहे. त्यात कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांनी 42946 रुपये बचत केले. जिवती तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा पारडोह, शिंदेवाही तालुक्यातील जी.प .उच्च प्राथमिक शाळा देलनवाडी, गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, भद्रावती तालुक्यातील जि .प. शाळा या विद्यार्थ्यांनी शालेय बचत बँकेत जमा केले आहे.
शालेय मंत्रिमंडळ चंद्रपूर जिल्हा परिषद ने हा उपक्रम 1215 शाळा मध्ये उपक्रम सुरू झाला आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना लोकशाहीचे प्रत्यक्ष स्वरूप समजावे, लोकशाहीच्या कार्याची समज निर्माण व्हावी, नेतृत्वगुणाचा विकास व्हावा, आत्मविश्वास निर्माण व्हावा, निर्णय क्षमता विकसित व्हावी आणि संविधानाने दिलेला अधिकाराची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्याचे सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
"जागृत पालक सुदृढ पालक"
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या महत्वकांक्षी अभियान 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, यांच्या समन्वयाने अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर येथील महर्षी विद्या मंदिर येथे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले या अभियाना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ५०२४१८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अथक प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, डॉक्टर राजकुमार गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.