चोरट्यांनी जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खुन करून दानपेटी पळवली!
चोरट्यांनी जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खुन करून दानपेटी पळवली!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- जिल्हात रोज चोरी, दरोडे याचे प्रमाण वाढत असून पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला का! आता शहरासह ग्रामीण भागातही चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आली. मधुकर खुजे, बाबुराव खारकर असे मृतकचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. मठात असलेली दानपेटी फोडलेल्या अवस्थेत होती.त्यामुळे दानपेटी फोडायला आलेल्या चोरांनी हत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथील मधुकर खुजे, बाबुराव खारकर यांची शेती गावात गावातील जगन्नाथ महाराज मठा लगत आहे.ते रोज शेतात जागलीसाठी जातात. मंदिर लागून असल्याने तिथे विसावा घेतात. बुधवारला पहाटेला मंदिरामध्ये या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वानपथक बोलावले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.