चंद्रपूर पंचायत समिती द्वारे मागासवर्गीयाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना

चंद्रपूर पंचायत समिती द्वारे मागासवर्गीयाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना

लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा गट विकास अधिकारी सपकाळ

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पंचायत समिती चंद्रपूर द्वारे मागासवर्गीयांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात.
या अनुषंगाने सन २०२२-२३ मध्ये २०% मागासवर्गीय (SC,ST,NT) पंचायत समिती सेस फंड योजना अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्याना ५००० रु. च्या मर्यादेपर्यंत स्पर्धा परीक्षा पुस्तके पुरविणे करीता दिनांक 10/03/23 • पर्यंत आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.
सदर लाभकारीता नियम, अटी व पात्रता खालीलप्रमाणे असतील.
१. अर्जदार ग्रामीण भागातील असावा/सरपंच यांचा रहिवाशी दाखला. २. अर्जदाराचे/वडिलांचे मागासवर्गीय (SC,ST,NT) असल्याचे जातीचे प्रमाणपत्र.
३. अर्जदाराचे पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
४. सन २०२२-२३ मधील UPSC/MPSC/ Combine पूर्व परीक्षेस प्रविष्ट झाल्याचे प्रमाणपत्र.
५. अर्जदारच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ५०००० पेक्षा कमी असल्याचे तालुका तहसिलदार/नायब तहसिलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र.
आवेदन पत्राचा नमूना मिळवण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
१. पंचायत समिती कार्यालय चंद्रपूर, समाजकल्याण/शिक्षण विभाग
२. जवळचे ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसचिव.

मागासवर्गीयांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजनेचा लाभ घेण्याची आव्हान चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे..