आनंदवाईन शॉप मध्ये ग्राहकावर जीव घेणा हल्ला! प्रकृती चिंताजनक!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज सायंकाळी साडेसात वाजता
दिलीप लक्ष्मण नरवाडे वय 32 हा दारू खरेदी करण्यासाठी आंनद वाईन शॉप मध्ये गेला असता. काही कारणास्तव बाचाबाची झाली. मात्र
आंनद वाईन शाप .संदिप अडवाणी मालकाने विदेशी दारूची बिअर बाटल डोक्यावर फोडून गभिंर जखमी केले. त्याला श्वेता दवाखाण्यात आय सी यू मध्ये भरती केले आहे. या अगोदर सुध्दा त्यांने त्याच्या पार्टनर ने कपूर नावाच्या ग्राहकावर हाणामारी झाली होती. . एन सी. मॅटर दाखल केला होता.अनेक ग्राहकावर छोटे मोठे बाचाबाची होत असल्याची माहिती समोर आली आहे .जखमीवर उपचार सुरू असून दिलीप हा रेल्वे मध्ये माताळी कामगार म्हणून काम
करतो .त्या दोन लहान मुले असून त्त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून उपचार सुरू आहे.
रामनगर पोलीस स्टेशन येथे कलम 307 गुन्हा दाखल झाला असून. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सुरू असून. आनंद वाईन शॉप मालकाला अटक करण्यात आली आहे. दिलीपच्या परिवाराने त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
चांदा यंग ब्रिगेडच्या सदस्या भाग्यश्री हांडे यांनी या प्रकरणाला लावून धरले असून अशा दादागिरी करणाऱ्या पैशाच्या माज असणा-या कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.