नवनवीन तंत्रज्ञानाचां वापर करून गावाचा विकास करावा.. विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी




नवनवीन तंत्रज्ञानाचां वापर करून गावाचा विकास करावा.. विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी

दिनचर्या न्युज '-
चंद्रपूर :-
आर .आर .पाटील स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत ग्रामपंचायत चेक आंबेधानोरा येथे जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात पोभुर्णा तालुक्यातील चेक आंबेधानोरा येथे भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. आर .आर .पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धा योजना अंतर्गत तालुक्यातील चेक आंबेधानोरा  या गावाचा तालुकास्तरीय तपासणीमध्ये प्रथम क्रमांक आला आणि जिल्हास्तरीय तपासणी करता पात्र झाली .त्यामुळे जिल्हास्तरीय तपासणी टीम मधील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे व गटविकास अधिकारी श्रीमती सुनिता मरसकोल्हे व तपासणी टीम मधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .भेटीदरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व विज्ञान कक्षला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली.

गावातील विकास कामांची पाहणी करून महिला बचत गटांच्या माध्यमातून  उद्योजक महिलांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे गावातील समस्या जाणून घेतल्या. गावातील ग्रंथालय, व्यायामशाळा, क्रीडांगण ,याची पाहणी केली. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली , घरकुल लाभार्थीना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन योजनेची तपासणी करण्यात आली व गावकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गावातील महिला बचत गट ,पुरुष बचत गट ,राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्न चे विद्यार्थी , अनामिका ग्रामसंघ महिला मंडळ , कार्यक्रमास सरपंच सौ.निरंजना मडावी उपसरपंच रमेश हनमलवार ग्रामपंचायत सदस्य सुमित्राताई जुमनाके श्रीमंती शारदाताई रेगुलवार ज्योतीताई कजपवार मुरलीधर कोडापे ,गणेश कुमरे  तसेच  ग्रामसेवक नयनपाल दुधे संगणक परिचालक सौ.आरती रेगुलवार  , शिपाई शैलेश मडावी, शुभम रेगुलवार , राकेश कोडापे  कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

दिनचर्या न्युज