वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण ! पत्रकारांकडे पास असूनही पोलीस प्रशासनाकडून यात्रेत जाण्यास मज्जाव!

वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण !

पत्रकारांकडे पास असूनही पोलीस प्रशासनाकडून यात्रेत जाण्यास मज्जाव!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 5/4/2023
चंद्रपूर येथे दोन वर्षानंतर महाकाली यात्रांसाठी लाखो लोककांचे जथ्थे महाकालीच्या देवी दर्शनासाठी आले आहेत. जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून भाविकांसाठी काय सुविधा, व्यवस्था करण्यात आली याचा वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या ओळख पत्र गळ्यात असलेल्या पत्रकारावर पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. police... Chandrapur
सविस्तर वृत्त- प्रशासनाच्या ढिशाळ व्यवस्थेची बातमी संकलित करण्याकरिता पाच एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास चंद्रपुरातील पार्थशर समाचारचे दोन प्रतिनिधी नेमण धामेकर, व सुनील देवांगन गेले असता. पोलिसांनी दोघांना पकडले व काही विचारपूस न करता विनाकारण मारहाण केली. झरपट नदीच्या पुलावर वृत्त संकलन ना साठी व्हिडिओ घेत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने महिला व पुरुष झरपट नदीच्या पात्रात उघड्यावर आंघोळ करीत आहेत. याचे चित्रीकरण करीत असताना शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी गेडाम यांनी दोघांना पकडून सरळ मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही महाकाली मंदिर परिसरातील पोलीस चौकीत देण्यात आले. तिथेही नेमनवर  पोलिसांनी हात उगारला. याची माहिती पार्थशर  समाचार चे संपादक राजेश नायडू यांना माहीत होताच तात्काळ  आले. संबंधित पोलीस अधिकारी गेडाम यांना  नायडू यांनी विचारले असता
आधी दोघांना व्हिडीओ कशाला शूट करीत आहे त्याबाबत विचारायला हवे होते .मात्र तुम्ही त्यांचं काही न ऐकता त्यांच्यावर हात उचलत वार्तांकन केलेला व्हिडीओ सुद्धा डिलीट केला. विशेष म्हणजे व्हिडीओ जर्नलिस्ट नेमन व सुनील च्या गळ्यात पार्थशर समाचार चे आयकार्ड असून सुद्धा गेडाम यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तसेच या यात्रेतून वृत्त संकलन व जाण्या येण्यास पत्रकारांना पोलीस प्रशासनाकडून पास देण्यात आल्या. मात्र पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांना जाऊ देण्यास निर्बंध घालण्यात आले. मग पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांना यात्रेत जाऊ द्यायचे नव्हते तर पास कशाला देण्यात आल्या असा प्रश्न पत्रकाराकडून करण्यात आला?
 यामुळे  अधिकाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर वचक आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे?
 अशा प्रकारची कुठलीही शहानिशा न करता.   पत्रकारांवर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हात उचलायला नको, याविरोधात पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांना याबाबत निवेदन देणार आहे.