न्यायालीन प्रक्रिया सुरू असतानाच चालले घरावर बुलडोझर , नीलजई येथील हृदयाला हेलवणारी घटना!
न्यायालीन प्रक्रिया सुरू असतानाच चालले घरावर बुलडोझर , नीलजई येथील हृदयाला हेलवणारी घटना!

कुठेच न्याय मिळत नाही, मग दाद मागायची कुणाकडे!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वरोरा तालुक्यातील नीलजई गाव येथे वडोलोपार्जित रहात असलेले हिवरकर कुटुंब .मात्र सख्ख्या भावानेस आपल्य भावाच्या पोटात खंजीर खूपसले. मधुकर दादाजी हिवरकर वय वर्ष 82 यांना उघड्यावर यावे लागले. यांच्या साध्यापनाचा फायदा घेवून घेतला.आजारी असल्याने ते आपल्या मुलीकडे आश्रयास असतात. अशातच भाऊ बाबाराव दादाजी हिवरकर यांनी त्यांच्या मालकी रहिवासी असलेले घर वामन नथूजी अंडरस्कर यांना फक्त सव्वा लाखात विकून टाकले. पत्रकार परिषदेत मुलगी विना अनिल दरणे, यांनी पत्रकार परिषदेत हृदयाला हेलवणारी आप बीती सांगितली. दिवाणी कोर्टात प्रकरण प्रंबलित असताना, गैर अर्जदारांनी एकमेकास संगमत करून कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या असल्याचा फायदा घेऊन वडीलाचे रहिवाट ताबा असलेले घर जेसीपीने पाडून जमीनदोस केले. घरात असलेल्या सामानाची नासधूस करून  या वृद्ध कुटुंबाचे नुकसान केले.
    या सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये लेखी स्वरुपात दिली असताना सुद्धा   वरोरा पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही. वारंवार पोलीस स्टेशनला या संदर्भाची माहिती दिली असता हे सुद्धा कुठलाही न्याय या  वृद्ध दांपत्याला मिळाला नाही. शेवटी राहते घर एकाच रात्रीतून जेसीपी ने जमीन दोष केले. न्यायालयात प्रकरण सुरू असल्याची बाब ग्रामपंचायत ला सुद्धा सांगितल्यावरही ग्रामपंचायत सचिवासह सरपंच यांनी संगमत करून वामन अंडरस्कर यांना साथ दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा  विद्यमान  कोर्टा समक्ष ' आम्ही वादग्रस्त घर पाडणार नाही, तेव्हा टेटस्कोची आवश्यकता नाही' असे अर्जदार हिचे वकिलाने उपस्थितीत काबुली केली. त्यामुळे विद्यमान कोर्टाने तेव्हा स्टेटस्को देणे थांबवले. तरी गैरअर्जदारांनी न्यायालयाच्या  आदेशाला केराची टोपली दाखवून वादग्रस्त 
मकानवर बुलडोझर चालवला. घरातील सामानाची  नासधूस केली.  आमचे घर कसे काय पाडले म्हणून विचारणा केली असता. तुमचे घर नाही हे घर वामनचे आहेत. तुम्ही पोलिसात, कोर्टात कुठेही गेल्या तरी आमचं कुणीही वाकड करू शकत नाही अशी धमकी देऊन उलट  आमच्यावरच अरे रावीची भाषा करीत होते. आम्ही याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला केली असताना सुद्धा आम्हाला कुठेही नाही मिळत नाही, तर मग न्यायासाठी कुठे जावं अशी भावनिक आहात  श्रमिक पत्रकार परिषद झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी न्यायची मागणी केली आहे.