आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा - आ. किशोर जोरगेवार





आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा - आ. किशोर जोरगेवार

मनपा आयुक्तांना सुचना, भव्य आरोग्य शिबिर, संयुक्त नियोजन बैठक संपन्न

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नागरिकांचे आणि त्यातही विशेष: महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पारिवारीक जबाबदारीच्या व्यस्ततेत रुग्णालयात उपचाराकरिता जाणे टाळणा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता आपण रुग्णसेवाच नागरिकांच्या दारी नेण्याचा संकल्प केला असुन आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवत शहरातील विविध भागात 11 भव्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिराचा प्रचार प्रसार करण्यासाठी मनपा प्रशासनाने आपली स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना केल्या असुन यात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही त्यांना सहकार्य करतील असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातुन चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे शहरातील 11 आरोग्य वर्धनी केंद्रात 1 जुन पासुन आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या विविध संघटना, शासकिय यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीचे एन.डी हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा उपायुक्त अशोक गराडे, मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आयएमए संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती साने, सावंगी मेघे रुग्णालयाचे शिबीर संयोजक नाना शिंगणे, डॉ. अशोक वासलवार, रोटरी क्लबचे तथा माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, लोकप्रतिनिधी म्हणुन आम्हाला करोडो रुपयांचा निधी मिळतो. मात्र यातील अधिकांश निधी हा रोड, नाली, इमारती बांधकाम आदी विकासकामांवर खर्च होतो. शिक्षण आणि आरोग्य यावर फार कमी निधी खर्च केला जातो. त्यामुळे आता हि परिस्थिती बदलायची आहे. आपण शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. आणखी निधी लागेल तर ते ही देण्याची आमची तयारी आहे. हे शिबिर भव्य झाली पाहिजे. लहान बालके आणि महिलांना होणा-या आजाराच्या सर्व चाचण्या या शिबिरामध्ये करण्यात याव्यात. केवळ तपासणीच नाही तर येथे येणा-या रुग्णावर निशुल्क औषधोपचार करण्यात यावा. शिबिरात येणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही असे सूक्ष्म नियोजन येथे करा अशा सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

यावेळी मनपा आयुक्त यांनी सदर शिबिरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. प्रत्येक आरोग्य शिबिरात विविध आजार तपासणीचे 12 विभाग केल्या जाणार आहे. यात महिलांच्या तपासणी करिता दोन वेगळे विशेष विभाग केल्या जाणार आहे. रुग्णांच्या अल्पोहाराची व्यवस्था शिबिरात केली जाणार आहे. एका केंद्रावर दोन दिवस चालणा-या या शिबिरासाठी पाच दिवस रुग्णांची नोदणी करुन त्यांना फाईल दिल्या जाणार आहे. तसेच आभा कार्डही सदर शिबिरामध्ये उपलब्ध करुन दिल्या जातील असे मनपा आयुक्त विपिल पालिवाल यांनी सांगीतले आहे. सदर शिबिराला आयएमए संघटनेचे डॉक्टर, मनपा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, शहर संघटक विश्वजीत शाहा, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर संघटिका कौसर खान, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, तापोष डे, आदींची उपस्थिती होती.