मुल येथील गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक, सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकाची माहिती!craim chandrapur

मुल येथील गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक, सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकाची माहिती!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 
मुल येते चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री संतोषसिंग चंदेलसिंग रावत यांचे वर दिनांक 11/ 5 /23 रोजी मारुती कार पांढऱ्या रंगाच्या सुझुकी असलेल्या कार मधून आलेल्या अज्ञात बुर्काधारी हल्लेखोरांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या त्याचे जखमी झाले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रावत त्यांच्या तक्रारीवरून
उप.क्र. 178/23 कलम 307, 34 भा द वि सह कलम3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या तपासासाठी चंद्रपूर पोलीस अधीक्षकानी वेगवेगळे 16 पचके तयार करून आरोपीची शोध मोहीम राबली होती. यात पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी राजवीर कुवरलाल यादव 36 वर्ष, अमर कुवरलाल यादव 29 वर्ष राहणार चंद्रशेखर आझाद चौक बाबू पेठ चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली.
यात चौकशी अंती आरोपींनी रावत यांना मुलांना वेकोलीत नोकरी लावण्यासाठी सहा लाख रुपये दिले. परंतु ते वारंवार मागूनही परत केले नाही म्हणून रागातून आरोपीने फिर्यादी यांचे वर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून पसार झाले होते.

 आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, काय काय शोध लागला, काय कारवाई सुरू आहे. याबाबत गुप्तता पाडली. सर्व बाबींच्या प्रश्नावर एकच उत्तर तपास सुरू आहे. संबंधित आरोपीकडून घटनेत वापरलेल्या कुठल्याही साहित्याची, वस्तूची माहिती पोलीस अधीक्षक यांनी देण्याचे टाळले.
आरोपी हे राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यातील उत्तर भारतीय सेलचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. यात मात्र बोलवता धनी, आणि मुख्य सूत्रधार हा कुणीतरी वेगळाच असून याच माध्यमातून राजकीय वर्तुळात खळबळ सुरू आहे. या संदर्भाची चौकशी व्हावी अशी मागणी राजकीय वर्तुळात होत आहे.सदर प्रकरणात प्राथमिक तपास सुरू आहे. 

 सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक, चांदूर हे करीत असून सदर गुन्ह्याचा तपास आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, मल्लिकार्जुन इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, निरीक्षक सतीश सिंह राजपूत, महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांनी अथक परिश्रम घेऊन सदर आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला आहे.